• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवाल

wp@dktechs.in by wp@dktechs.in
January 21, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवाल


धाराशिव,दि. 21-देशासह महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. यामागे इव्हीएम मशीन हेच कारण आहे. भाजपा प्रत्येक निवडणुकीत इव्हीएमच्या जोरावर सत्ता काबीज करत आहे. म्हणून इव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी काँग्रेस पक्ष सातत्याने करत आहे, असे वक्तव्य महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे धाराशिव जिल्हा दौर्‍यावर आले असता बुधवार, दि. 21 जानेवारी रोजी सकाळी त्यांनी हॉटेल किंग्ज गार्डन येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी धाराशिव जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, नगर परिषदेचे माजी गटनेते खलील सय्यद, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहर काँग्रेसचे उमेश राजेनिंबाळकर विलास शाळू, सिद्धार्थ बनसोडे, धनंजय राऊत, अभिषेक बागल, अक्षय जोगदंड, जयसिंग पवार, मन्सुर सय्यद, सरफराज काझी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, मागील अनेक निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाची मोठी घसरण दिसून आली. याला इव्हीएम मशीनवरील मतदान हेच कारण आहे. त्यामुळे आता जनतेतही संभ्रम निर्माण झाला आहे. तांदुळवाडी येथे काही तरूणांनी इव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया घेण्यात यावी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या मागणीला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा देण्यासाठी आपण त्यांची भेट घेतली असल्याचे सांगून काँग्रेस पक्षाची विचारधारा ही लोकशाहीला पूरक आहे. पण जाती-पातीचे राजकारण करून सत्ताधारी पक्ष  लोकशाहीला बाधक असे राजकारण करत असल्याचे ते म्हणाले.

शेतकर्‍यांची कर्जमाफी, वीजबिल याबाबत केंद्र व राज्यातील सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. शेतकरी आणि सर्वसामान्य व्यावसायिक, जनतेच्या अडचणी वाढत आहेत. त्यामुळे सरकारने योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या विचारधारेला मानणार्‍या समविचारी पक्षांना सोबत घेवून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Previous Post

आमदार सावंत यांच्या झंझावाती नेतृत्वावर विश्वास – राष्ट्रवादीच्या दिग्गजांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Next Post

धाराशिव बसस्थानकात रात्री बसची तोडफोड करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासात  केले गजाआड

Next Post

धाराशिव बसस्थानकात रात्री बसची तोडफोड करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासात  केले गजाआड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.