• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

सांजा जिल्हा परिषद गटात शिवसेना (ठाकरे) पक्षाचा वाढता प्रभाव

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 5, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांजा जिल्हा परिषद गटात शिवसेना (ठाकरे) चा वाढता प्रभाव

धाराशिव – लोकमदत न्यूज

मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तस तसा शिवसेना (ठाकरे) उमेदवारांना मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्यातच खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार कैलास पाटील जिल्हा सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्यासह शिवसेना-काँग्रेस (आय) पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रचार फेरी यामुळे संपूर्ण मतदारसंघात वातावरण ढवळून निघाले आहे. या मतदारसंघांमध्ये शिवसेनेचा झंझावात निर्माण झाला असून सांजा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रदीप सुभाष घोणे, चिखली पंचायत समिती गणाचे उमेदवार सुरेश कोळी व चिखली पंचायत समिती गणाचे उमेदवार आशा राजदीप गायकवाड यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा मतदार संघात सुरू झाली आहे.

धाराशिव तालुक्यातील सांजा जिल्हा परिषद गट, गण व चिखली गणातून शिवसेनेचे उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. या मतदार संघात शिवसेनेचे प्राबल्य असून गावागावात त्यांना प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या मदतीला काँग्रेस (आय) पक्षासोबत आघाडी झाली असून शिवसेना व काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात राळ उडवून दिली आहे. सांजा जिल्हा परिषद मतदार संघामध्ये सांजा, चिखली, राजुरी, बोरगाव (राजे) बोरखेडा, सकनेवाडी, महाळंगी, देवळाली, मेडशिंगा, शेकापूर आदी गावांचा समावेश आहे. हा मतदार संघ शिवसेना व काँग्रेस आय पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघांमध्ये प्रदीप घोणे, सुरेश कोळी व आशा गायकवाड हे मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.  त्यांच्या प्रचारासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व मकरंद राजेनिंबाळकर यांनी तर आमदार कैलास पाटील व मकरंद राजेनिंबाळकर यांनी प्रचार सभा घेऊन मतदारांना या भागात शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकास कामाची मांडणी केली आहे. तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते या मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन डोअर टू डोअर भेट घेऊन मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. विशेष म्हणजे मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्यामुळे चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या उमेदवारांना गावागावांत मिळणारा उदंड प्रतिसाद हा उमेदवारांच्या विजयाचा मार्ग सुकर होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

चिखली येथे मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांची जाहीर सभा उत्साहात…

Next Post

ऑल इंडिया पॅंथर सेनेचा सांजा जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना (ठाकरे) ला जाहीर पाठिंबा

Next Post

ऑल इंडिया पॅंथर सेनेचा सांजा जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना (ठाकरे) ला जाहीर पाठिंबा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • ह.भ.प. कल्याणराव चव्हाण यांचे धाराशिव
  • “हायकोर्टाचा कडक दणका! महाकाली कला केंद्रावर सीलची तलवार — नियमभंग उघड, कारवाई अटळ”
  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट

Recent Comments

  1. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.