• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

धाराशिव शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळा स्थगिती रद्द : आ. राणाजगजितसिंह पाटील

wp@dktechs.in by wp@dktechs.in
December 22, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळा स्थगिती रद्द : आ. राणाजगजितसिंह पाटील

नगरोत्थान योजनेतून मंजूर धाराशिव शहरातील रस्ते व नालीच्या कामांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शहरातील रस्त्यांच्या कामांना देण्यात आलेली स्थगिती आता रद्द करण्यात आली आहे त्यामुळे ५९ रस्त्यांची आणि नाल्यांची कामे आता युद्धपातळीवर सुरू होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

धाराशिव शहरातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरोत्थान योजनेतून शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी तब्बल ₹११७ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून शहरातील ५९ रस्ते व नाल्यांची कामे करण्यात येणार आहेत. निधी मंजूर झाला आता कामे सुरू झाली तर
आपली अकार्यक्षमता जनतेसमोर येईल या भीतीने जिल्ह्यातील अपप्रवृत्तीच्या विरोधकांनी वेगवेगळ्या पद्धतीने या कामाला आडकाठी आण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. यासाठी त्यांनी अनेक हातखंडे वापरत हा विषय अनेक महिने प्रलंबित ठेवला. मात्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्याला अनुसरून सदर कामांसाठी धाराशिव नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांनी दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी कार्यारंभ आदेश जारी केले होते. त्यानुसार दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी या कामांना प्रत्यक्ष प्रारंभ देखील झाला. मात्र, पालकमंत्री यांच्या कडे काही नागरिक व जनप्रतिनिधींनी निवेदन सादर केले होते.या अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या पत्राच्या आधारावर उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे सदर कामांना स्थगिती दिली.

त्या पत्रात सादर केलेल्या मुद्द्यांची सत्यता तपासण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ४ नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. सचिवांच्या माध्यमातून निविदा प्रक्रियेची सखोल तपासणी करण्यात आली असता, संपूर्ण प्रक्रिया नियमबद्ध व पारदर्शक रितीने पार पडल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, यावर देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती उठविण्यात आली होती व शहरातील रस्ते कामांचा देण्यात आलेली स्थगिती रद्द झाल्याचा निर्णय चार नोव्हेंबर रोजीच झाला होता. मात्र त्या कालावधीत जिल्ह्यात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता सुरू होती. त्यामुळे स्थगिती रद्द होऊनही कामाला सुरुवात करता आली नाही. आता आज स्थगित रद्द झाल्याचे अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेली नागरिकाची हेळसांड आणि गैरसोय आता दूर होणार आहे. रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यासाठी आता कोणतीही आडकाठी येणार नाही. पालिका निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांनी भाजपाला भरभरून कौल दिल्यानंतर लगेच ही आनंदाची वार्ता आली आहे. त्यामुळे उद्यापासून कामाला सुरुवात होणार असून औपचारिक शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत नंतर केला जाणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

Previous Post

पो.नि दराडे यांनी धाराशिव शहरात विस्कळीत झालेली शांतता व सुव्यवस्था सहा महिन्यांत केली पुनर्स्थापित !

Next Post

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली…ठाकरे गटाचा प्रतिहल्ला: ‘स्थगिती देणारे आणि उठवणारे सरकार एकच!’

Next Post

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली...ठाकरे गटाचा प्रतिहल्ला: 'स्थगिती देणारे आणि उठवणारे सरकार एकच!'

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.