• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

धाराशिव शहरातील नगराध्यक्ष पद आरक्षण सोमवारी ठरणार! राजकीय पक्षांसह शहरवासीयांची उत्सुकता शिगेला

wp@dktechs.in by wp@dktechs.in
October 4, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव शहरातील नगराध्यक्ष पद आरक्षण सोमवारी ठरणार!– राजकीय पक्षांसह शहरवासी उत्सुकता शिगेला

राज्यातील नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणासाठी ६ ऑक्टोबरला सोडत
मुंबई दि. ४ (अमजद सय्यद) :महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणासाठीची सोडत जाहीर केली आहे. ही सोडत येत्या सोमवार, दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी मंत्रालयातील ६ वा मजला, परिषद सभागृह, मुंबई येथे पार पडणार आहे.
राज्यातील २४५ नगरपरिषद आणि १३४ नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण सोडत काढण्यात येत आहे. या सोडतीनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी आरक्षणाचा आराखडा स्पष्ट होणार आहे.
नगरविकास विभागाच्या सूचनेनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव मंत्रालयीन प्रवेश मर्यादित ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सोडतीच्या प्रक्रियेत उपस्थित राहण्यासाठी प्रत्येक पक्षातील फक्त दोन प्रतिनिधींनाच आमंत्रण देण्यात आले आहे. संबंधित पक्षांचे अध्यक्ष अथवा सचिव यांनी आपल्या दोन प्रतिनिधींची नावे शासनाकडे शिफारस करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मागील तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या काळात अनेक इच्छुक उमेदवारांनी तयारी करूनही त्यांचा हिरमोड झाला होता. मात्र आता शासनाने निवडणुकीच्या हालचालींना गती दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.
धाराशिव शहरातील नगराध्यक्ष पद हे मागील निवडणुकीत सर्वसाधारण पुरुषांसाठी आरक्षित होते. त्यानंतर दीर्घकाळ निवडणुका न झाल्याने येथे प्रशासन राजवट सुरू आहे. त्यामुळे यावेळी नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाबाबत उत्सुकता अधिक आहे. धाराशिव ही जिल्ह्यातील सर्वात मोठी “अ” दर्जाची आणि जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी नगरपालिका असल्याने सर्व राजकीय पक्षांचे डोळे यावर खिळले आहेत.
सोमवारी होणाऱ्या या सोडतीनंतर धाराशिव शहरासह जिल्ह्यातील उमेदवारांचे भवितव्य ठरणार असून, राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  dharashiv collectordharashiv lokmadat newsजिल्हाधिकारी कार्यालयनगर परिषद धाराशिवनगर परिषद मुख्याधिकारीनगरविकास मंत्रीनगराध्यक्ष आरक्षण सोडतनिवडणूक आयोगमंत्रालयमहाराष्ट्र
Previous Post

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धाराशिव शहरात धम्म रॅलीस प्रतिसाद

Next Post

आता शासकीय योजनांच्या जोडीला क्रॉउड फंडिंगही
अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा मिळावा यासाठी सकारात्मक प्रयत्न आ. राणा. पाटील

Next Post

आता शासकीय योजनांच्या जोडीला क्रॉउड फंडिंगही
अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा मिळावा यासाठी सकारात्मक प्रयत्न आ. राणा. पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.