• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

शेतकरी राजा जगण्यासाठी (MGNREGA) मजुरी वाढवा, शंभर दिवसांची मर्यादा उठवा!

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 30, 2025
in कृषी
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शेतकरी राजा जगण्यासाठी (MGNREGA) मजुरी वाढवा, शंभर दिवसांची मर्यादा उठवा!
धाराशिव दि.३० (अमजद सय्यद):मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर झाली आहे. पिके जमीनदोस्त झाली, सुपीक माती वाहून गेली, घरं-नद्या-नाले पाण्याने भरून गेले. या आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला असताना शासनाने अद्यापपर्यंत अधिकृत मदत जाहीर केलेली नाही. राज्यकर्ते दौऱ्यांमध्ये गुंग असताना शेतकरी मात्र जगण्यासाठी संघर्ष करीत आहे. अशा स्थितीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (MGNREGA) तातडीने रोजगार उपलब्ध करून द्यावा, मजुरी दर वाढवावा आणि शंभर दिवसांची बंधनकारक मर्यादा रद्द करावी, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
सध्या महाराष्ट्रात MGNREGA अंतर्गत एका मजुरास दिवसाला केवळ 312 रुपये मजुरी मिळते. यावर वार्षिक 100 दिवसांच्या मर्यादेनुसार एका कुटुंबाला फक्त 30,200 रुपये मिळतात. या रकमेवर संपूर्ण वर्षाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. त्याच वेळी शेजारील राज्यांमध्ये मजुरी दर यापेक्षा लक्षणीय जास्त आहे. हरियाणामध्ये 400 रुपये, सिक्कीममध्ये 389 रुपये, गोव्यात 378 रुपये, कर्नाटकात 370 रुपये, केरळमध्ये 369 रुपये, पंजाबमध्ये 346 रुपये, दादरा नगर हवेलीमध्ये 340 रुपये, तर तामिळनाडू, लक्षद्वीप व पुदुच्चेरीमध्ये 336 रुपये मजुरी मिळते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मात्र केवळ 312 रुपये हा अन्यायकारक दर ठरतो आहे. “शेजारील राज्यांमध्ये जास्त मजुरी मिळत असेल तर महाराष्ट्रातील शेतकरी कमी दराने का काम करणार?” असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.
योजनेतील आणखी एक गंभीर बाब म्हणजे एका कुटुंबाला मिळणारे काम केवळ 100 दिवसांपुरतेच मर्यादित आहे. कुटुंबात एक व्यक्ती असो वा पाच, जॉब कार्ड एकच! त्यामुळे पाच जणांच्या कुटुंबालाही एकत्रित केवळ शंभर दिवस मजुरी मिळते. यामुळे वार्षिक कमाईची मर्यादा तीच राहते आणि पाच जणांचे कुटुंब 30 हजार रुपयांत वर्ष काढण्याच्या दुष्चक्रात अडकते. अनुभवी शेतकऱ्यांनी सांगितले की, “प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र दिवसांची मर्यादा असावी, अन्यथा योजनेचा लाभ अपुरा ठरतो.”
आजपर्यंत मराठवाडा हा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो, मात्र यंदा या भागात ढगफुटीच्या स्वरूपात पाऊस झाल्याने शेती उद्ध्वस्त झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांसोबत शेतातील मातीही वाहून गेली आहे. या परिस्थितीत शेतकरी कर्जमाफीची अपेक्षा करीत असला तरी ती झाल्यावरसुद्धा पुढील वर्षी पेरणीसाठी येणाऱ्या जूनपर्यंत जगायचं कसं, हा प्रश्न कायम आहे. शेतकऱ्यांचा आक्रोश आहे की “कर्जमाफी झाली तरी उदरनिर्वाहासाठी रोजगार हवा. पिके जूनमध्येच घेता येतील, पण तोपर्यंत जगण्यासाठी आधार हवा.”
MGNREGA ही केंद्र सरकारची योजना असली तरी राज्य सरकारकडे यातील मजुरी दर व दिवसांच्या मर्यादेबाबत केंद्राशी पाठपुरावा करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांची व्यथा शासनदरबारी भक्कमपणे मांडली पाहिजे. “फक्त दौरे नकोत, आमची व्यथा संसदेत व विधानसभेत पोहोचली पाहिजे. मजुरी दर वाढला पाहिजे आणि दिवसांची मर्यादा उठली पाहिजे,” अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
शेतकऱ्यांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील मजुरी दर किमान ४०० ते ५०० रुपयांपर्यंत वाढवावा, एका कुटुंबासाठी शंभर दिवसांची मर्यादा दुप्पट-तिप्पट करावी, प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र जॉब कार्डची सुविधा द्यावी, तसेच फळबाग लागवड, विहीर खणणे, चर खोदकाम, रस्ता मजबुती अशी कामे तातडीने उपलब्ध करून द्यावीत. याशिवाय कर्जमुक्तीबरोबर शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक आधार मिळाल्याशिवाय शेतकरी राजा जगू शकणार नाही अशी भावना देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
आज जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी जगण्यासाठी झगडत आहे. जर शासनाने वेळेवर उपाययोजना केली नाही, तर भविष्यात याहून गंभीर परिस्थिती निर्माण होईल. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तत्काळ पाठपुरावा करून मजुरी दर वाढवणे, शंभर दिवसांची मर्यादा उठवणे आणि तातडीने कामे सुरू करणे हाच शेतकऱ्यांच्या जगण्याचा आधार आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की “आम्हाला आधार द्या, मजुरी वाढवा, दिवसांची मर्यादा उठवा, अन्यथा आम्ही जगणार कसे?” असा संतप्त सवाल देखील शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  atiwrushthiatiwrushthi madatdharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsmrgsosmanabadअतिवृष्टीअनुदानआमदारआमदार कैलास पाटीलआमदार तानाजीराव सावंतआमदार प्रवीण स्वामीआमदार राणाजगजितसिंह पाटीलखासदार ओमप्रकाश राजे निंबाळकरखासदार ओमराजे निंबाळकरजिल्हाधिकारी कार्यालयधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकमदतकार्य
Previous Post

इटलकर खून प्रकरणी आरोपीस अटक न केल्यास कुटूंब आत्मदहन करणार

Next Post

धाराशिव शहर होर्डिंगमुक्त होण्यास सुरुवात! जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर नगर पालिकेची तत्पर कृती…नागरिकांचा सुटकेचा निःश्वास

Next Post

धाराशिव शहर होर्डिंगमुक्त होण्यास सुरुवात! जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर नगर पालिकेची तत्पर कृती...नागरिकांचा सुटकेचा निःश्वास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.