• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यास पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा गतीदायक पाठपुरावा
५५५.८० कोटीं रुपयांच्या कामांना तांत्रिक मान्यता

wp@dktechs.in by wp@dktechs.in
January 9, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यास पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा गतीदायक पाठपुरावा
५५५.८० कोटीं रुपयांच्या कामांना तांत्रिक मान्यता

धाराशिव दि.९ जानेवारी (प्रतिनिधी)   श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या भव्य विकास आराखड्याला शासनस्तरावर वेग मिळाला असून,पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रकल्पातील कामांना तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

या विकास आराखड्याच्या पाठपुराव्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे संबंधित सर्व यंत्रणांची आढावा बैठक घेतली.

या बैठकीला आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार, मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांची ऑनलाईन तर सभागृहात अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कळवकर,जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक माया माने, नगर परिषद तुळजापूर मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे,सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत साळी, अधिक्षक अभियंता महावितरण संजय आडे,छत्रपती संभाजीनगरचे राज्य पुरातत्व विभागाचे वैभव वानखेडे,तुळजापूर पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता  प्रज्वलित मंगरुळे,तुळजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता व्ही.वाय.आवाळे  यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखड्यास १८६५ कोटी रुपयांच्या निधीस शासनाकडून मान्यता मिळाली आहे.शासनाने मंजूर केलेल्या या विकास आराखड्यात एकूण ५५५.८० कोटीं रुपयांच्या चार प्रमुख कामांचा समावेश असून त्यांचे अंदाजपत्रक तयार करून त्यास तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. या अंतर्गत घाटशीळ पार्किंग येथे भाविक सुविधा केंद्र व बहुउद्देशीय वाहनतळ उभारणीसाठी ७७.०२ कोटी रुपये,हडको पार्किंग परिसरात सुविधा केंद्र,व्यावसायिक संकुल, बहुउद्देशीय सभागृह व वाहनतळासाठी ३७६.३३ कोटी रुपये,आराधवाडी पार्किंग येथे सुविधा केंद्रासाठी ४५.४३ कोटी रुपये तसेच जुने एस.टी.स्टँड परिसरात भाविक सुविधा केंद्रासाठी ५७.२३ कोटीं रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

याशिवाय या विकास आराखड्यातील ४५७.८० कोटी रुपयांच्या कामांची अंदाजपत्रके तयार करून त्यांना तांत्रिक मान्यता देण्यात आली असून निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.तसेच सन २०२५-२६ साठी ५४.२८ कोटी रुपयांची तरतूद आणि सन २०२६-२७ साठी ५०० कोटी रुपयांच्या अंदाजित तरतुदीचे नियोजन करण्यात आले आहे.भूमी संपादनासाठी यापूर्वीच २८.८८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, उपविभागीय अधिकारी,धाराशिव यांच्यामार्फत संपादन प्रक्रिया सुरू आहे.तसेच सल्लागार शुल्कापोटी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही शासनाकडे करण्यात आली आहे.

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी श्री तुळजाभवानी मंदिर परिसराचा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्याही विकास व्हावा या हेतूने हा प्रकल्प मार्गी लावला आहे.भाविकांना सुरक्षित,सोयीस्कर आणि सुव्यवस्थित सुविधा मिळाव्यात यासाठी हा आराखडा आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

विकास आराखड्यातील मंजूर कामे अनुभवी कंत्राटदारांकडून वेळेत करुन घ्यावेत,या कामास गती द्यावी, कंत्राटदारांकडून योग्य अंदाजपत्रक मिळाले नसल्यास निधी मंजूरीस अडचण निर्माण होते,त्यामुळे योग्य अंदाजपत्रक मागवून घ्यावे,विकास आराखड्यातील सर्व कामे जानेवारी २०२८ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही पालकमंत्री सरनाईक यांनी यावेळी दिल्या.

प्रिबीडमधील सूचनांचा स्विकार करण्याचे पूर्ण अधिकार श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी पूजार यांना असतील असे  पालकमंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले.श्री तुळजाभवानी मंदिराच्या अवतीभवतीच्या महसूली जमीनी मंदिर संस्थानला वर्ग करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा.मंदिर परिसरामध्ये पोलीस चौकी बांधण्यासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात येईल असे पालकमंत्री प्रताप सरनाईक यावेळी म्हणाले.

आमदार राणाजगजितसिंह यांनी श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याशी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित पाहणी करुन वेगवेगळे अहवाल तयार करून स्वतंत्र प्रस्ताव मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना

या प्रकल्पामुळे भाविकांच्या सुविधांमध्ये आमूलाग्र सुधारणा होणार असून तुळजापूर शहराच्या पर्यटन,रोजगार व आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे.

Previous Post

“तुळजापुरात गुटख्याचा खुलेआम सुळसुळाट कारवाईच्या मागणीसाठी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा इशारा – 31 जानेवारीला आंदोलन”

Next Post

तुळजापूर येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा नियमित जामीन अर्ज तात्काळ मंजूर ॲड अमोल वरुडकर यांचा महत्वाचा युक्तिवाद आला कामी

Next Post

तुळजापूर येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा नियमित जामीन अर्ज तात्काळ मंजूर ॲड अमोल वरुडकर यांचा महत्वाचा युक्तिवाद आला कामी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.