• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

गॅस टंचाई – फुटपाथवरील गरिबांवरच कारवाईचा बडगा मोठ्या हॉटेल्सवर प्रशासनाची ‘मौनसंमती’?

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 19, 2026
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

फुटपाथवरील गरिबांवरच कारवाईचा बडगा मोठ्या हॉटेल्सवर प्रशासनाची ‘मौनसंमती’?

गॅस टंचाईच्या नावाखाली छोट्या व्यावसायिकांवर धडक कारवाई; बिअर बार, ढाबे मात्र सुरळीत – जिल्हावासीय संतप्त

धाराशिव | लोकमदत न्यूज

जिल्ह्यात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असला, तरी तो केवळ फुटपाथवरील आणि विशेष म्हणजे गोरगरीब हातावरील पोट असणाऱ्या चहा, भजी, वडापाव विक्रेत्यांवरच का? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित होत आहे. एका बाजूला सामान्य नागरिक आणि लहान व्यवसायिक गॅससाठी पहाटेपासून रांगा लावत आहेत, तर दुसऱ्या बाजूला मोठे हॉटेल्स, बिअर बार आणि ढाबे मात्र कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना अक्षरशः वणवण भटकंती करावी लागत असून, अनेकांना पहाटे पाच वाजल्यापासून गॅस एजन्सीसमोर बसण्याची वेळ आली आहे. एवढेच नव्हे, तर काही ठिकाणी बुकिंगही घेतली जात नसल्याने नागरिकांपुढे स्वयंपाकाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. घरगुती गॅसवर पूर्ण अवलंबून असलेल्या कुटुंबांना आता पर्यायच उरलेला नाही.
या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागाने धाराशिव शहरातील सेंट्रल बिल्डिंग परिसर, डीआयसी रोडवरील काही छोट्या हॉटेल्स व गाड्यांवर अचानक कारवाई केली. पवार वडापाव मिसळ सेंटर आणि संजय राठोड यांच्या हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे आढळून आले. तसेच पॅराडाईज हॉटेलमध्ये कमर्शियल सिलेंडर आढळून आला. संबंधित ठिकाणांहून सिलेंडर जप्त करून आनंद नगर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून, प्रभारी पुरवठा निरीक्षक विशाखा बलकवडे यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
मात्र, या कारवाईनंतर प्रश्न अधिक तीव्र झाला आहे. कारण, शहरासह जिल्ह्यात मोठ्या हॉटेल्स, बिअर बार, रेस्टॉरंट आणि ढाब्यांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा वापर होत असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. “लहान व्यावसायिकांवर कारवाई आणि मोठ्यांना मोकळीक” अशी दुहेरी भूमिका प्रशासन का घेत आहे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
या कारवाईमुळे फुटपाथवरील विक्रेत्यांचे केवळ दुकानच बंद झाले नाही, तर त्यांच्या रोजीरोटीवरही गदा आली आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या या छोट्या व्यावसायिकांना प्रशासनाच्या कारवाईचा फटका बसत असून, त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील गॅस टंचाईचे मूळ कारण शोधून त्यावर उपाययोजना करण्याऐवजी फक्त कारवाईचा दिखावा केला जात असल्याची टीका होत आहे. जर खरोखरच नियमांची अंमलबजावणी करायची असेल, तर मोठ्या व्यावसायिकांवरही समान कारवाई करणे आवश्यक आहे, अशी मागणी जोर धरत आहे.
“नियम सर्वांसाठी समान असावेत; अन्यथा ही कारवाई अन्यायकारकच!” अशी संतप्त प्रतिक्रिया आता सर्वसामान्यांमधून उमटत आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक : अमजद सय्यद 8390088786

Previous Post

धाराशिव येथे राज्यस्तरीय गंगाधर करंडक नाट्य स्पर्धा, नृत्य स्पर्धा आणि कलावंत मेळावा

Next Post

कलेच्या नावाखाली देहव्यापाराचा घृणास्पद प्रकार 4 कला केंद्रांवर रॅकेटचा पर्दाफाश, 9 आरोपींवर गुन्हा

Next Post

कलेच्या नावाखाली देहव्यापाराचा घृणास्पद प्रकार 4 कला केंद्रांवर रॅकेटचा पर्दाफाश, 9 आरोपींवर गुन्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.