• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

धाराशिवमध्ये तेरणा हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर — ८५२ नागरिकांना लाभ

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 22, 2025
in आरोग्य
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिवमध्ये तेरणा हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर — ८५२ नागरिकांना लाभ
फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आ.पाटील यांच्या पुढाकाराने धाराशिवकरांना आरोग्यसेवेची भेट
धाराशिव, दि. २२ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वतीने तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, नेरूळ (नवी मुंबई) यांच्या सहकार्याने धाराशिव शहरात भव्य मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरात हृदयरोग, नेत्ररोग, बालरोग, स्त्रीरोग, त्वचारोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग, पोटाचे विकार अशा विविध आजारांवरील तपासणी व औषधोपचार करण्यात आले. नेरूळ येथील तेरणा हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर्स शिबिरासाठी खास उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली.
आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले की, ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, त्यांचे पुढील उपचार नेरूळ येथील तेरणा हॉस्पिटलमध्ये मोफत केले जाणार आहेत. तसेच, जे उपचार तेरणा हॉस्पिटलमध्ये शक्य होणार नाहीत, ते मुंबईतील जे.जे. आणि केईएम सारख्या नामांकित रुग्णालयांत करण्यात येणार आहेत.
या शिबिरातून एकूण ८५२ रुग्णांनी लाभ घेतला.
हे शिबिर प्रभाग क्रमांक १७, गाझी स्कूल, खाजा नगर, शम्स चौक, धाराशिव (उस्मानाबाद) येथे आयोजित करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी सुनील काकडे, विनोद गपाट, आबा इंगळे, राजसिंह राजे निंबाळकर, अक्षय ढोबळे, अलीम पठाण, पटेल सर, पुष्पकात मळाळे, विलास लोंढे, जोशी, आकाश तावडे, विशाल पाटील, नाईकवाडी, बिलाल रजवी, इलियास पिरजादे, फहाद सिद्दिकी, शहबाज पठाण, मुजाहिद काझी यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहुण्यांचे भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा शहराध्यक्ष फर्मान काझी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी फिरोज पठाण, सुरज सैलानी, महमूद मुजावर, जाकीर पठाण, फरहान काझी, कैफ पठाण, अमजद सय्यद, रेहान काझी, बब्बू मुजावर, समीर शेख, समीर बेग, मुजाहिद शेख यांनी मोलाचे सहकार्य केले. तर आरिफ मुजावर, जैनू मुजावर, काझी अबूहुरेरा, काझी सुद, सय्यद सेहेल, अल्ताफ शेख आदींनीही शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले.
सदरील शिबिर हे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे तसेच भारतीय जनता पक्ष अल्पसंख्यांक सेल धाराशिव शहराध्यक्ष फर्मान काझी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या संपन्न झाले.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabad praksah abitakarआमदार राणाजगजितसिंह पाटीलआरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरआरोग्य शिबिरउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

तुळजापूर शारदीय नवरात्र महोत्सवादरम्यान दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेचा दणका

Next Post

तुळजापुरात घटस्थापनेने श्री तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ

Next Post

तुळजापुरात घटस्थापनेने श्री तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.