• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

पुरात वाहून गेलेल्या कुटुंबियांना केली आर्थिक मदत…एक हात मदतीचा ग्रुपचा आधार !

wp@dktechs.in by wp@dktechs.in
October 20, 2025
in कृषी
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुरात वाहून गेलेल्या कुटुंबियांना केली आर्थिक मदत

एक हात मदतीचा ग्रुपचा आधार !

धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) – यंदा शेतकरी अतिवृष्टी, महापूर आणि पिकांची नासाडी आदी सासख्या नैसर्गिक संकटात सापडलेला आहे. या पुरामध्ये काही शेतकरी वाहून गेले तर पिक वाहून गेल्यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे कुटुंबाचे छत्र हरवलेल्या कुटुंबियांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा विवंचनेत सापडलेल्या कुटुंबाच्या मदतीला…एक हात मदतीचा ग्रुप..
धाऊन आला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून संबंधित कुटुंबियांच्या वारसास प्रत्येकी ५ हजार रुपयांप्रमाणे २२ कुटुंबांना १ लाख १० हजार रुपयांची रोख आर्थिक मदत करण्यात आली आहे. त्यामुळे हा ग्रुप अडचणीच्या काळात त्या कुटुंबांचा आधार बनला आहे.
धाराशिव व सोलापूर जिल्ह्यांवर निसर्गाचा प्रकोप झाला असून पुराच्या पाण्यात शेतकरी व नागरिक वाहून गेले. त्याबरोबरच शेतातील उभी पिके देखील मातीसह वाहून गेली आहेत. पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या व पिक उध्वस्त झाल्यामुळे नैराश्यात सापडून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वारस सदस्य असलेल्या पत्नी व इतर नातेवाइकांना नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील नामपूर येथील एक हात मदतीचा या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येकी पाच हजार रुपये रोख स्वरूपात घरी तसेच बांधावर जाऊन ती मदत पोहोच केली आहे. ही मदत करण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, न्यूज 18 लोकमतचे संपादक विलास बडे व सामाजिक कार्यकर्ते राहुल भड यांचे मार्गदर्शन लाभले. हा ग्रुप नामपूर येथील असून यामध्ये बाहेरगावी नोकरी करणाऱ्या तरुणांचा समावेश आहे. गेल्या ९ वर्षांपासून या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे, आश्रम शाळेत जाऊन विद्यार्थ्यां समवेत वाढदिवस साजरा करणे व इतर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या कुटुंबांना पंकज कापणीस, रोहिदास कापणीस, महेश कापणीस, अमोल पाटील, अविनाश मोरे व हर्षल कापडे, राहुल भड आदींसह संबंधित कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.


या आपतीग्रस्त कुटुंबियांना केली मदत

एक हात मदतीचा या ग्रुपच्या माध्यमातून मयत कुटुंबियांच्या वारसास प्रत्येकी ५ हजार रुपयांप्रमाणे रोख रक्कम त्यांच्या घरी तसेच बांधावर जाऊन पोहोच केली. यामध्ये धाराशिव जिल्ह्यासह बार्शी तालुक्यातील शेतकरी कुटुंबांचा समावेश आहे. यामध्ये श्वेता शरद गंभीर व उमेश विधाते (कारी), बाळासाहेब भोसले (रऊळगाव), अर्चना उमाकांत संकपाळ (गौडगाव), बाळासाहेब पवार (संगमनेर), लक्ष्मण पवार (म्हात्रेवाडी), श्रीरंग दराडे (भालगाव), लक्ष्मण कढपे (झरेगाव), प्रकाश लोंढे (आवाड शिरपुरा), लक्ष्मण गावसाने (दहिटणा), मोहन बोरगावे (उंबरे गव्हाण), बालाजी मोरे (नागूर), उमेश ढेपे (अणदुर), चंद्रशेखर लोखंडे (जवळगा मेसाई) आदींसह इतर शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

अतिवृष्टीत खरडून गेलेल्या जमिनी व फळबागांना नुकसानभरपाई द्यावी – आ. कैलास पाटलांची मागणी

Next Post

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०१ गोधनांची दिवाळी भेट!

Next Post

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०१ गोधनांची दिवाळी भेट!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.