• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

आरटीई 25% प्रवेशासाठी ‘एक किलोमीटर’ अट रद्द करा दत्ता पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 7, 2026
in शिक्षण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आरटीई 25% प्रवेशासाठी ‘एक किलोमीटर’ अट रद्द करा दत्ता पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धाराशिव | लोकमदत न्यूज

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत ‘घरापासून शाळा एक किलोमीटर अंतरावर असावी’ ही अट रद्द करण्याची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
सन 2026–27 शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दि. 17 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाली आहे. या प्रवेशासाठी शासनाने घरापासून शाळा एक किलोमीटर अंतरावर असावी अशी अट लागू केली आहे. यापूर्वी ही मर्यादा पाच किलोमीटरपर्यंत होती, त्यानंतर ते अंतर कमी करून तीन किलोमीटर पर्यंत करण्यात आली होती. मात्र सध्या ती यावर्षी आणखीन कमी करून एक किलोमीटर करण्यात आल्याने अनेक पालकांना अर्ज करताना अडचणी येत आहेत.
ऑनलाईन अर्ज भरताना पोर्टलवर एक किलोमीटरच्या पुढील शाळा दिसत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज भरता येत नाहीत. त्यामुळे दुर्बल व वंचित घटकातील अनेक विद्यार्थी या शैक्षणिक संधीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या पाल्याला चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे, अशी इच्छा असूनही अनेक पालकांना या अटीमुळे प्रवेश मिळवणे कठीण जात आहे.
दरम्यान, आरटीई ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 मार्च 2026 असल्याने ही अट तातडीने रद्द करून अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवण्यात यावी व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
सदरील निवेदन दत्ता (तात्या) पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी सुमेध क्षीरसागर, संतोष मोरे, संतोष पेठे, शाहूराज चव्हाण, बालाजी कांबळे, राहुल पेठे, सचिन बगाडे, राज मगर, अमर कांबळे, आशिष पेठे, सचिन पेठे, तानाजी क्षीरसागर, शिवाजी क्षीरसागर आदी उपस्थित होते.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती – उपसभापतींचा सत्कार धाराशिव पंचायत समितीत भाजप महायुतीचा जल्लोष

Next Post

शेतकरी व रोजगारासह धाराशिवच्या विकासला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प – दत्ताभाऊ कुलकर्णी

Next Post

शेतकरी व रोजगारासह धाराशिवच्या विकासला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प - दत्ताभाऊ कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.