• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

आरोग्य कर्मचाऱ्यांचे समायोजनासाठी खा.ओमराजे निंबाळकर व आ.कैलास पाटील यांना निवेदन

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 5, 2025
in आरोग्य
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव दि.५ (प्रतिनिधी) – राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी १९ ऑगस्टपासून सुरू असलेले बेमुदत संप आंदोलन आज १८ व्या दिवशी पोहोचले आहे. शासनाने अद्याप कोणताही तोडगा न काढल्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना निवेदन सादर केले. सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

आरोग्य विभागात दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के समायोजन व्हावे, तसेच प्रत्येक वर्षी तीस टक्क्यांप्रमाणे सार्वजनिक आरोग्य, ग्रामविकास, नगरविकास, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागामध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली. शासन निर्णय दि.१४ मार्च २०२४ नुसार पात्र कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करून नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व हक्क द्यावेत, समान काम समान वेतन लागू करावे आणि वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार पगारवाढ द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. रिक्त पदांवर समायोजन न झाल्यास अधिसंख्य पदे निर्माण करून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात यावा, तसेच राष्ट्रीय आयुष मिशन, एचबीटी आपला दवाखाना, १५ वा वित्त आयोग नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रातील कर्मचाऱ्यांना आरोग्य अभियानातील रिक्त जागांवर समाविष्ट करण्यात यावे, असा ठराविक आग्रहही या निवेदनात व्यक्त करण्यात आला.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची सहा वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांना नियमित करण्याचा निर्णय सर्वांवर लागू करावा, तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत समकक्ष पदे उपलब्ध नसल्यास नवीन पदे निर्माण करून समावेश करावा. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत उपकेंद्रासाठी प्रस्तावित आकृतीबंधात कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांऐवजी नियमित पदे निर्माण करावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

या वेळी किरण बारकुल, किशोर गवळी, किरण तानवडे, मुकुंद उंबरे, विनोद मोरे, शरद हिंगमीरे, संतोष कोरपे, नितीन सुरवसे, प्रशांत वाघमारे, दत्ता पुरी, वैशाली बिडवे, चांगुणा झोंबाडे, शीतल गायकवाड, मीनाक्षी सुरवसे यांच्यासह महिला व पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: #धाराशिव #उस्मानाबाद आंदोलनcmodharashiv osmanabad praksah abitakarआरोग्यमंत्रीमोर्चा धाराशिव उस्मानाबाद
Previous Post

केशेगाव कारखान्यातील कामगारांच्या समस्यांबाबत वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

धाराशिव प्रशालेत शिक्षक दिन उत्साहात साजरा

Related Posts

मास्क काढा म्हणत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी हुज्जत;
आरोग्य

मास्क काढा म्हणत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी हुज्जत;

September 19, 2026
पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही
आरोग्य

पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही

September 6, 2026
भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…दरवर्षी शिबिर भरविण्याचा मानस – मल्हार पाटील
आरोग्य

भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…दरवर्षी शिबिर भरविण्याचा मानस – मल्हार पाटील

July 22, 2026
भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करा – जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ
आरोग्य

भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करा – जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ

July 22, 2026
तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार! मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही
आरोग्य

तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार! मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही

July 16, 2026
आरोग्य

हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात ‘जागतिक युनानी दिवस’ उत्साहात

February 13, 2026
Next Post

धाराशिव प्रशालेत शिक्षक दिन उत्साहात साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!