• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

नगर परिषदेची कचरा संकलन निविदा रद्द करा;

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
October 22, 2026
in राजकारण
0
नगर परिषदेची कचरा संकलन निविदा रद्द करा;
0
SHARES
30
VIEWS

धाराशिव नगर परिषदेची कचरा संकलन निविदा रद्द करा; ठाकरे सेनेची मागणी, रस्त्यावर उतरण्याचा इशारा

धाराशिव | लोकविचार

धाराशिव नगर परिषदेच्या शहरातील घर ते घर कचरा संकलन, साफसफाई आणि गटार सफाईच्या कामासाठी राबविण्यात आलेली वार्षिक निविदा प्रक्रिया शासन निर्णयाचे उल्लंघन करून करण्यात आल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. ही निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा पारदर्शकपणे राबवावी, अशी मागणी नगरसेविका सोनाली वाघमारे आणि नगरसेवक पंकज पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली आहे. मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख रवींद्र वाघमारे उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनानुसार, नगर परिषदेने शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या कामासाठी वार्षिक निविदा प्रक्रिया राबविली आहे. मात्र, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निविदा प्रक्रियेसंदर्भातील २०१८ च्या शासन निर्णयानुसार सक्षम प्राधिकाऱ्यांची प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता मिळाल्याशिवाय निविदा प्रसिद्ध करू नये, तसेच कार्यारंभ आदेश देऊ नयेत, अशी तरतूद आहे.

मात्र, धाराशिव नगर परिषदेने ६ जुलै २०२६ रोजी निविदा प्रसिद्ध केली. या कामाला तांत्रिक मान्यता २४ ऑगस्ट २०२६ रोजी, तर प्रशासकीय मान्यता २९ सप्टेंबर २०२६ रोजी मिळाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही मान्यता मिळण्यापूर्वीच निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. मान्यता मिळण्याआधीच निविदेची रक्कम कोणत्या आधारावर निश्चित करण्यात आली, याचे स्पष्टीकरण शासनाने द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

नगरसेविका सोनाली वाघमारे यांनी नगर परिषदेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, या म्हणीप्रमाणे नगर परिषदेचा कारभार सुरू आहे. कचरा व्यवस्थापनासारख्या महत्त्वाच्या विषयाकडे केवळ कमाईचे साधन म्हणून पाहिले जात असेल आणि त्यासाठी निविदा प्रक्रियाही बेकायदेशीरपणे राबविली जात असेल, तर नियम बनवायचे कशासाठी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नगरसेवक पंकज पाटील यांनीही प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “नियम डावलून ही प्रक्रिया कोणाच्या दबावाखाली राबविण्यात आली? सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे नव्हे, तर नागरिकांचे सेवक म्हणून काम करा. विरोधक संपले आहेत, या गैरसमजात भाजपने राहू नये,” असा इशारा त्यांनी दिला.

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित या निविदा प्रक्रियेवरून आता राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. संबंधित निविदा रद्द करून नव्याने पारदर्शक प्रक्रिया राबविण्याची मागणी ठाकरे गटाने केली असून, याप्रकरणी प्रशासन आणि शासन काय भूमिका घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectorआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनगर परिषद मुख्याधिकारीनगराध्यक्ष नगर परिषद धाराशिवराजकारणशिवसेना
Previous Post

एसटीच्या प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही

Related Posts

महाराष्ट्र राज्य नेट-सेट-पीएच.डी. कृती समिती महासंघाचा डॉ. प्रतापसिंह पाटील यांना जाहीर पाठिंबा
राजकारण

महाराष्ट्र राज्य नेट-सेट-पीएच.डी. कृती समिती महासंघाचा डॉ. प्रतापसिंह पाटील यांना जाहीर पाठिंबा

October 20, 2026
भाजपला धाराशिव मोठा धक्का!
राजकारण

भाजपला धाराशिव मोठा धक्का!

October 19, 2026
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे
राजकारण

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026

ताज्या घडामोडी

नगर परिषदेची कचरा संकलन निविदा रद्द करा;

नगर परिषदेची कचरा संकलन निविदा रद्द करा;

October 22, 2026
एसटीच्या प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही

एसटीच्या प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही

October 22, 2026
सुकटा मारहाण प्रकरणातील मुख्य फरार आरोपी जेरबंद

सुकटा मारहाण प्रकरणातील मुख्य फरार आरोपी जेरबंद

October 21, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!