• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

‘माऊली’च्या नावावर कोट्यवधींचा खेळ?

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 10, 2026
in क्राईम
0
‘माऊली’च्या नावावर कोट्यवधींचा खेळ?
0
SHARES
659
VIEWS

‘माऊली’च्या नावावर कोट्यवधींचा खेळ? बोगस बिलांचा आरोप, धाराशिव मध्यम प्रकल्प विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह!

धाराशिव लोकविचार (भाग एक)

धाराशिव माध्यम प्रकल्प विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करणारे आरोप समोर आले असून, ‘माऊली इंटरप्राईजेस’ आणि ‘माऊली टूर अँड ट्रॅव्हल्स’च्या नावाने बोगस बिले तयार करून शासकीय निधीचा अपहार केल्याचा आरोप तक्रारदार सुरज महादेव माळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनातून केला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.माळी यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ‘माऊली इंटरप्राईजेस, धाराशिव’च्या नावाने 250 प्रिंटर टोनरचा पुरवठा दाखवून तब्बल 11 लाख 50 हजार 500 रुपयांचे बिल काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

संबंधित फर्म प्रत्यक्षात अस्तित्वात आहे का, वर्क ऑर्डर, पावती, पुरवठा आणि बिलाची नोंद यांची चौकशी करावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.याशिवाय ‘माऊली टूर अँड ट्रॅव्हल्स, आळणी’च्या नावाने 17 लाख 71 हजार 63 रुपयांचा आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, संबंधित फर्म आपल्या नावाचा गैरवापर करून तयार करण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.निवेदनातील सर्वात गंभीर आरोप वाहनांच्या वापराबाबत आहेत. एकाच वाहन क्रमांकाची एकाच दिवशी मुंबई आणि औरंगाबाद अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी वापर झाल्याचे दाखवण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

तसेच काही प्रवासांमध्ये प्रत्यक्ष अंतरापेक्षा मोठ्या प्रमाणात किलोमीटर दाखवून शासकीय निधीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, काही बिले व कागदपत्रांवर बनावट स्वाक्षरी आणि शिक्क्यांचा वापर करून मुद्रा बँकेमार्फत आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळे संबंधित सर्व बिलांची, वर्क ऑर्डरची, पावत्यांची, एमबी नोंदींची, वाहन वापराच्या नोंदींची आणि बँक व्यवहारांची स्वतंत्रपणे तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आरटीआयच्या माहितीवरही संशय?

तक्रारदाराने या प्रकरणासंदर्भात माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली होती. मात्र, संबंधित माहिती वेळेत व पूर्ण स्वरूपात देण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वारंवार कार्यालयात जाऊनही अपूर्ण अथवा चुकीची माहिती देण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

तसेच 24 जून 2026 रोजी संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली असता, चौकशी करण्यास नकार देत ‘खुशाल कोर्टात जा’ अशा स्वरूपाची दमदाटी करण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

या सर्व आरोपांमुळे शासकीय निधीच्या वापरावर तसेच संबंधित कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या आरोपांची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी होऊन सत्य समोर येणे आवश्यक आहे.संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच शासकीय निधीचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सुरज महादेव माळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

(भाग एक)

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारosmanabadअपहारआमदार कैलास पाटीलउस्मानाबादजिल्हाधिकारी धाराशिवधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपोलिस अधीक्षक धाराशिवफ्रॉडमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसलूटसंगनमत
Previous Post

पत्रकारांच्या प्रश्नांसाठीचा लढा आणखी तीव्र करणार : संदीप काळे

Next Post

१५ ऑगस्ट रोजी १५१ फूट भगवा ध्वज चे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण!

Related Posts

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला
क्राईम

मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला

September 24, 2026
बसस्थानकात पोलिसाच्याच खिशावर डल्ला;
क्राईम

बसस्थानकात पोलिसाच्याच खिशावर डल्ला;

September 24, 2026
Next Post
१५ ऑगस्ट रोजी १५१ फूट भगवा ध्वज चे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण!

१५ ऑगस्ट रोजी १५१ फूट भगवा ध्वज चे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण!

ताज्या घडामोडी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!