• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धक्कादायक! तुळजापूर तालुक्यात वन्य प्राण्यांचे तांडव; ७५ कोकरांचा एकाच वेळी शिकारीने घेतला बळी!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
April 30, 2026
in महाराष्ट्र
0
धक्कादायक! तुळजापूर तालुक्यात वन्य प्राण्यांचे तांडव; ७५ कोकरांचा एकाच वेळी शिकारीने घेतला बळी!
0
SHARES
61
VIEWS

धक्कादायक! तुळजापूर तालुक्यात वन्य प्राण्यांचे तांडव; ७५ कोकरांचा एकाच वेळी शिकारीने घेतला बळी!

नळदुर्ग (प्रतिनिधी): अझहर शेखएकीकडे कडक उन्हाचा तडाखा आणि दुसरीकडे वन्य प्राण्यांची दहशत, अशा दुहेरी संकटात तुळजापूर तालुक्यातील मेंढपाळ सापडले आहेत. जळकोट शिवारात सोमवारी दुपारी झालेल्या एका भीषण हल्ल्यात वन्य प्राण्यांनी तब्बल ७५ मेंढ्यांच्या पिलांचा म्हणजेच कोकरांचा फडशा पाडला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.भरदुपारी शेडवरच हल्ला नेहमीप्रमाणे मेंढपाळ आपल्या मोठ्या मेंढ्या चारण्यासाठी शिवारात गेले होते. उन्हामुळे लहान पिलांना शेतातच असलेल्या शेडमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले होते. मात्र, दुपारी दीडच्या सुमारास निर्मनुष्य ठिकाण पाहून वन्य प्राण्यांनी या शेडवर हल्ला केला. या हल्ल्यात ६३ पिलांचा जागीच मृत्यू झाला, तर १२ पिलांनी नंतर प्राण सोडले.या घटनेत दयानंद भोगे, मनोज कदम, बालाजी सोनटक्के, हरिबा सोनटक्के, दत्ता सोनटक्के, अमोल सुरवसे आणि राजेंद्र भोगे या मेंढपाळांची कोकरे दगावली आहेत. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने हे सर्व व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.”आम्ही जगायचे कसे? वर्षभराची मेहनत एका क्षणात संपली. शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी,” अशी मागणी पीडित मेंढपाळांनी केली आहे.दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. वन्य प्राण्यांचा हा हल्ला नेमका कोणत्या प्राण्याने केला, याचा तपास वनविभाग करत आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरातील मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलआमदार राणाजगजितसिंह पाटीलउस्मानाबादतुळजापूर विधानसभाधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

धाराशिव बस डेपोचा 40 वर्षांचा विकास रखडला; पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनीच घ्यावा आधुनिकीकरणाचा निर्णय

Next Post

प्रवाशांच्या सेवेसाठी परिवहन मंत्री सरनाईक यांची थेट महामार्गावरील हॉटेलमध्ये जाऊन केली पाहणी

Related Posts

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
महाराष्ट्र

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
Next Post
प्रवाशांच्या सेवेसाठी परिवहन मंत्री सरनाईक यांची थेट महामार्गावरील हॉटेलमध्ये जाऊन केली पाहणी

प्रवाशांच्या सेवेसाठी परिवहन मंत्री सरनाईक यांची थेट महामार्गावरील हॉटेलमध्ये जाऊन केली पाहणी

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!