• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी 1000 कोटी रुपये तातडीने द्या – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 17, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी 1000 कोटी रुपये तातडीने द्यावे- खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली केंद्रीय रेल्वे मंत्र्याकडे मागणी



धाराशिव–छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाबाबत विशेष मागणी


          नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेल्वे मंत्रालयाच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेदरम्यान धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांवर ठाम आणि आक्रमक भूमिका मांडत केंद्र सरकारचे लक्ष वेधले.

            मराठवाड्याच्या विकासासाठी सक्षम रेल्वे सुविधा अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित करत त्यांनी खालील महत्त्वाच्या मागण्या केल्या:

१. धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी 1000 कोटी रुपयाची तात्काळ तरतुद करावी

            तुळजापूरला रेल्वेने जोडण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. धाराशिव ते तुळजापूर या मार्गाचे काम सुरू असले तरी तुळजापूर ते सोलापूर हा टप्पा अजूनही निविदा प्रक्रियेत अडकलेला आहे. या संपूर्ण मार्गासाठी सुमारे २ हजार कोटी रुपयांची आवश्यकता असून केंद्राने आपला १ हजार कोटी रुपयांचा हिस्सा तातडीने मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली. यामुळे आई तुळजाभवानीचे पवित्र तीर्थक्षेत्र रेल्वे नकाशावर येईल.

२. लातूर-पुणे इंटरसिटी गाडी तातडीने सुरू करा

            लातूर, धाराशिव आणि बार्शी परिसरातील हजारो विद्यार्थी व नोकरदार दररोज पुण्याकडे प्रवास करतात. सध्याच्या गाड्यांची अपुरी संख्या लक्षात घेता लातूर ते पुणे इंटरसिटी गाडी तातडीने सुरू करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली.





३. हरंगूळ-पुणे गाडी पुणे मुख्य स्थानकापर्यंत चालवा

            सध्या हरंगूळ ते पुणे गाडी हडपसरपर्यंतच धावते, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते. ही गाडी पूर्वीप्रमाणे पुणे मुख्य स्थानकापर्यंत चालवावी, अशी मागणी करण्यात आली.

४. रेल्वे थांबे व नवीन मार्गांचे सर्वेक्षण

* कळंब रोड स्थानकावर लातूर-मुंबई गाडीला थांबा देण्यात यावा

* ढोकी स्थानकावर नांदेड-पनवेल गाडीला थांबा द्यावा

* धाराशिव ते छत्रपती संभाजीनगर या नवीन मार्गाच्या सर्वेक्षणासाठी मंजूर निधीबद्दल समाधान व्यक्त करत हे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली

५. पुणे-सिकंदराबाद जलद गती मार्ग धाराशिव-लातूरमार्गे न्यावा

पुणे ते सिकंदराबाद या प्रस्तावित जलद गती मार्गाचा समावेश धाराशिव व लातूरमार्गे करण्यात यावा, जेणेकरून मराठवाड्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली

६. धाराशिव–छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाबाबत विशेष मागणी

छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याचे प्रमुख विभागीय व न्यायिक केंद्र असून येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ, अजिंठा-वेरूळसारखी जागतिक वारसा स्थळे तसेच Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University असल्यामुळे मराठवाड्यातील नागरिक, विद्यार्थी व विविध क्षेत्रातील लोकांची येथे सतत ये-जा सुरू असते

            धाराशिव ते छत्रपती संभाजीनगर हा थेट रेल्वे मार्ग निर्माण करणे अत्यंत आवश्यक असून यामुळे मराठवाड्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होईल, असे खासदारांनी ठामपणे मांडले. या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी केंद्र सरकारकडून ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त करत रेल्वे मंत्रालयाचे आभार मानण्यात आले. मात्र हे सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला गती द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली . या मार्गामुळे धाराशिव व परिसरातील नागरिकांना छत्रपती संभाजीनगर येथे प्रवास करणे अधिक जलद, सुरक्षित व सोयीस्कर होणार असून विद्यार्थी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

लोकमदत न्यूजच्या वृत्तांची दाखल थेट विधानसभेत आ. सुरेश धस यांची लक्षवेधी – बांधकाम कामगार घोटाळ्यावर कामगार मंत्र्यांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!

Next Post

जि.प. अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांचा पाणी पुरवठा सभापती विलास लोंढे माजी नगरसेवक बापू पवार यांच्या हस्ते सत्कार

Related Posts

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
महाराष्ट्र

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
Next Post

जि.प. अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांचा पाणी पुरवठा सभापती विलास लोंढे माजी नगरसेवक बापू पवार यांच्या हस्ते सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!