• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

शाळा, महाविद्यालये आणि बसस्थानक परिसरात ‘निर्भय’ व ‘पिंक’ पथकाची गस्त वाढणार

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 3, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शाळा, महाविद्यालये आणि बसस्थानक परिसरात ‘निर्भय’ व ‘पिंक’ पथकाची गस्त वाढणार
धाराशिव शहर आता महिलांसाठी होणार अधिक सुरक्षित
नगराध्यक्षा नेहा काकडे यांची पोलीस अधीक्षकांशी चर्चा

धाराशिव लोकमदत न्यूज


शहरातील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, प्रशासकीय पातळीवर आता मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून शहरात महिलांसाठी निर्भय वातावरण निर्माण करण्यासाठी धाराशिवच्या नगराध्यक्षा नेहा राहुल काकडे यांनी पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी शहरातील टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.


शहरातील शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग (ट्युशन क्लासेस) आणि बसस्थानक यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी मुलींना टवाळखोरांकडून होणारा त्रास वाढल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर, नेहा काकडे यांनी पोलीस प्रशासनाकडे खालील मागण्या मांडल्या. निर्भय पथक आणि पिंक पथकाची वर्दळीच्या ठिकाणी गस्त वाढवण्यात यावी, महिलांच्या तक्रारींची दखल घेऊन संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, महिलांमध्ये विश्वासाचे आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांनी सक्रिय राहावे आदी विषयांवर प्राधान्याने चर्चा करण्यात आली.

पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. महिला सुरक्षा हे पोलीस प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. शहरातील असुरक्षित ठिकाणांचे सर्वेक्षण करून त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त आणि गस्त अधिक प्रभावी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव शहर महिला व मुलींसाठी सुरक्षित, निर्भय आणि विश्वासार्ह बनवणे हाच आमचा मुख्य उद्देश असल्याचे
नगराध्यक्षा नेहाताई राहुल काकडे यांनी नमूद केले आहे.या महत्त्वपूर्ण बैठकीला कळंबच्या नगराध्यक्षा सुनंदा कापसे आणि धाराशिव नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती वैशाली सुशांत सोनवणे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून उचलण्यात आलेल्या या ठोस पावलामुळे शहरातील महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रभावी उपायोजना आखली जाईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Previous Post

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

Next Post

आनंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत पत्त्याच्या क्लबचा पुन्हा धुमाकूळ? उच्चभ्रू वसाहतीमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

Next Post

आनंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत पत्त्याच्या क्लबचा पुन्हा धुमाकूळ? उच्चभ्रू वसाहतीमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • पावसाळ्यापूर्वी प्रभाग क्र. ९ मधील नाले-गटारी तातडीने साफ करा इनामदार यांची मागणी
  • इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन ; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला
  • बूथ मजबूत तर पक्ष मजबूत राष्ट्रवादी काँग्रेस श. प.पक्षाची संघटनात्मक बैठक संपन्न
  • महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”“शहरातील हायवा गायब
  • “महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”

Recent Comments

  1. Chief Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Chris Webber on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Allen Bell on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Cody Smith on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Carl James on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.