• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

आरोग्य कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे यासह इतर मागण्यासाठी बेमुदत संप

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 21, 2025
in आरोग्य
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव दि.२१ (प्रतिनिधी) – ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या १० वर्षे सेवा झालेल्या आहेत. त्यांचे १०० टक्के समायोजन व प्रत्येक वर्षी ३० टक्यांप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभाग, ग्राम विकास व नगर विकास विभाग तसेच वैद्यकिय शिक्षण व संशोधन विभागामध्ये समावेशन करण्यात यावे यासह इतर मागण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समितीच्यावतीने जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचे दि.१९ ऑगस्टपासून बेमुदत संप आंदोलन सुरू असून आज दि.२१ रोजीचा तिसरा दिवस आहे. मात्र यावर शासनाने अद्यापही तोडगा काढला नाही. जोपर्यंत शासन यावर तोडगा काढणार नाही तोपर्यंत हे संपरुपी आंदोलन सुरु राहणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

आरोग्य विभागामध्ये कार्यरत असलेल्या ज्या अधिकारी व कर्मचारी यांची १० वर्षे सेवा पूर्ण झालेली आहे. अशा कर्मचाऱ्यांचे १०० टक्के समायोजन व प्रत्येक वर्षी ३० टक्क्यांप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभाग, ग्राम विकास व नगरविकास विभाग, वैद्यकिय शिक्षण व संशोधन विभागामध्ये समावेशन करण्यात यावे. तर शासन निर्णय दि.१४ मार्च २०२४ रोजी निर्गमित झाल्यापासून कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समावेशन करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे जोपर्यंत शासन स्तरावर पात्र कर्मचाऱ्यांचे समावेशन होईपर्यत, त्यांना सर्व सेवा समायोजीत केलेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करावेत. तसेच त्यांना सर्व नियमित शासकिय कर्मचाऱ्यांचे नियम व वेतन आयोगाच्या वेळोवेळी होणाऱ्या शिफारशीनुसार वेतन वाढ करावी किंवा समान काम समान वेतन लागू करावे. ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे रिक्त जागे समायोजन होणार नाही अशा सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचे अधिसंख्य पदे निर्माण करुन समावेशन करावे. त्याबरोबरच
ऑक्टोबर नोव्हेंबर २०२३ मधील आंदोलनात ज्या कर्मचाऱ्यावर पोलिस केस दाखल झालेल्या आहेत, त्या रद्द करण्यात याव्यात. तर राष्ट्रीय आयुष मिशन, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, एचबीटी आपला दवाखाना व १५ वा वित्त आयोग नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र इंजिनिअर (विद्युत) अंतर्गत या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये रिक्त जागी दि १४/०३/२०२४ शासन निर्णयाप्रमाणे समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात यावा. तर
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या सेवा कालावधी ६ वर्षे पुर्ण झाल्यानंतर कंत्राटी सेवा नियमित करण्याचा निर्णय सर्वाना लागू करण्यात यावा. तर नागपूर, गोंदिया व जालना जिल्ह्यातील सर्पोट स्टाफ समायोजन नियुक्ती आदेशाची अंमलबजावणी करावी, त्यांना तातडीने रिक्त पदावर हजर करुन घ्यावे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांचे समकक्ष पद व समान शैक्षणिक पद समायोजनास नसेल तर या कर्मचारी यांच्या सेवा समायोजनासाठी वित्त विभागाचा शासन निर्णय दि. १५ जुलै २०२५ नुसार आकृतीबंधमध्ये नवीन पद निर्माण करावे.  सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत उपकेंद्राच्या प्रस्तावीत आकृतीबंदमध्ये कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकारी असे प्रस्तावीत केले आहे. त्याऐवजी नियमित समुदाय आरोग्य अधिकारी पद निर्माण करावे. तरी कंत्राटी आयुष वैद्यकिय अधिकारी (BMS), RBSK वैद्यकिय अधिकारी यांचे गट-ब वैद्यकिय अधिकारी म्हणून आयुर्वेदिक डिस्पेंसरी, प्रा. आ. केंद्र, ग्रा.रु.व उपजिल्हा रुग्णालय, रुग्णालय, वैद्यकिय शिक्षण विभाग, महानगरपालिका, जिल्हा कारागृह विभागात समान शैक्षणिक अर्हतेनुसार आणि BHMS, BUMS यांना वैद्यकिय अधिकारी गट-ब यांना RH, SDH व DH येथे समायोजन करावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु आहे.  या आंदोलनामध्ये जीवन कुलकर्णी, किरण बारकुल, सतीश गिरी, किरण तानवडे, किशोर गवळी, अशोक चव्हाण, किशोर तांदळे, अमर सपकाळ, कलीम शेख, शर्मिला ठवरे, पठाण, रणखांब, सस्ते, गाढवे, संजय मुळे, रवींद्र यादव, विनोद मोरे, सुरेश पाटील, डॉ विक्रांत राठोड, गणेश चव्हाण, संतोष पोतदार, बाळासाहेब कोळेकर,विश्वजित जगदाळे, अमृत कुंभार आदींसह महिला व पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

Tags: आंदोलनआरोग्य विभागआरोग्य सेवाआरोग्यमंत्रीजिल्हा परिषदजिल्हा शासकीय रुग्णालयधाराशिवबेमुदत संपमहाराष्ट्रमोर्चारुग्णसेवावैद्यकीय सेवा
Previous Post

श्री सिद्धिविनायक परिवाराकडून शेतकऱ्यांना अंतिम 200 रुपयांचा हप्ता जमा

Next Post

हरवलेले / चोरीस गेलेले ५ लाख किंमतीचे ३३ मोबाईल तांत्रिक पद्धतीने शोधून पोलीसांनी फिर्यादींना केले परत

Related Posts

भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…दरवर्षी शिबिर भरविण्याचा मानस – मल्हार पाटील
आरोग्य

भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…दरवर्षी शिबिर भरविण्याचा मानस – मल्हार पाटील

July 22, 2026
भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करा – जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ
आरोग्य

भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करा – जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ

July 22, 2026
तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार! मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही
आरोग्य

तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार! मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही

July 16, 2026
आरोग्य

हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात ‘जागतिक युनानी दिवस’ उत्साहात

February 13, 2026
आरोग्य

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी नौमान शेख यांचा अधिष्ठाता चौहान यांच्या हस्ते गौरव

January 26, 2026
आरोग्य

नववर्षाची भेट : १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण

January 2, 2026
Next Post

हरवलेले / चोरीस गेलेले ५ लाख किंमतीचे ३३ मोबाईल तांत्रिक पद्धतीने शोधून पोलीसांनी फिर्यादींना केले परत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!