• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

परंड्यासह उमरग्याचे दोन अपक्ष सदस्य आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या गोटात

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 16, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

परंड्यासह उमरग्याचे दोन अपक्ष सदस्य आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या गोटात

तानाजी सावंतांना मोठा धक्का

जिल्हा परिषदेच्या सत्तासंघर्षात राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या दुटप्पी राजकारणाला त्यांच्याच बालेकिल्ल्यात सुरुंग लागला आहे. सावंतांनी लोकसभेत महायुतीच्या धर्माला हरताळ फासत विरोधकांशी पडद्यामागून हातमिळवणी केल्याचा आरोप करत, त्यांच्याच पक्षातील निष्ठावंत आणि अपक्ष सदस्यांनी आता आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे. यामुळे जिल्हा परिषदेत महायुतीच्या सत्ता स्थापनेचा मार्ग आता आणखी सोपा झाला आहे.

सावंतांच्या ‘दुटप्पी’ भूमिकेचा त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराला रसद पुरवून महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी सावंतांनी प्रयत्न केल्याचा खळबळजनक दावा निवडून आलेल्या सदस्यांनी केला आहे. “हाफकिन” आणि “खेकडा” यांसारख्या विधानांनी जिल्ह्याची नाचक्की करणाऱ्या सावंतांनी नेहमीच पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत, त्यांचे पुतणे आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनीच काकांच्या नेतृत्वाचा त्याग केला आहे. त्यांनी अर्चनाताई पाटील यांच्या अध्यक्षपदासाठी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे.

परंड्यासह उमरग्याच्या दोन अपक्ष सदस्यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास पसंती दिली आहे. परंडा तालुक्यातील लोणी गटातून निवडून आलेल्या अपक्ष उमेदवार राणी रेवनाथ ढोरे यांनी आमदार तानाजी सावंतांची साथ सोडून राणाजगजितसिंह पाटलांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेच्या सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, उमरगा तालुक्यातील तुरोरी गटाच्या अर्चना युवराज जाधव आणि आलुर गटाचे आप्पासाहेब मल्लिनाथ पाटील या अपक्ष सदस्यांनीही महायुतीला पाठिंबा दिला आहे.

सध्या महायुतीकडे स्पष्ट बहुमत असून, यामध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे:
भाजप: १९
राष्ट्रवादी काँग्रेस: ०६
शिवसेना (शिंदे गट): ०७
अपक्ष: ०४
एकूण: ३६ सदस्य
हे सर्व सदस्य सध्या सहलीवर असून, सावंतांच्या विरोधकांना मदत करण्याच्या छुप्या राजकारणामुळे तसेच शिवसेनेच्या उमेदवारांना जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या त्रासाचा पाढाच या सदस्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर वाचला आहे. या राजकीय भूकंपामुळे जिल्ह्यात सावंतांचे वर्चस्व धोक्यात आले असून राणाजगजितसिंह पाटलांची पकड मजबूत झाली आहे.

Previous Post

धाराशिव नगर परिषदेत मूलभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह महिला नगराध्यक्ष, सत्ताधारी ११ महिला नगरसेविका… तरीही स्वच्छतागृहासाठी महिलांची फरफट!

Next Post

धाराशिव शहरात साकारणार ८९.७६ कोटींचे भव्य सहा मजली जिल्हा न्यायालय

Related Posts

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे
राजकारण

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
Next Post

धाराशिव शहरात साकारणार ८९.७६ कोटींचे भव्य सहा मजली जिल्हा न्यायालय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!