• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

भाजपा नेते मल्हार राणा जगजितसिंह पाटील यांच्या सौजन्याने मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, धाराशिव आयोजित महाराष्ट्राचा शाहिरी बाणा : फोक आख्यानातून लोकसंगीताचा जल्लोष

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 13, 2026
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS

भाजपा नेते मल्हार राणा जगजितसिंह पाटील यांच्या सौजन्याने मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, धाराशिव आयोजित महाराष्ट्राचा शाहिरी बाणा : फोक आख्यानातून लोकसंगीताचा जल्लोष

धाराशिव, प्रतिनिधी :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, धाराशिव यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्राचा शाहिरी बाणा या सांस्कृतिक कार्यक्रमात फोक आख्यान, शाहिरी परंपरा आणि पारंपरिक लोककलेचा प्रभावी संगम अनुभवायला मिळाला. भाजपा नेते मल्हार राणा जगजितसिंह पाटील यांच्या सौजन्याने संपन्न झालेल्या या सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
युवाशाहीर चंद्रकांत माने आणि युवाशाहीरा ऋतुजा माने यांनी आपल्या दमदार आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा आणि स्वराज्याची प्रेरणा सादर केली. धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास उलगडणाऱ्या पोवाड्यांनी उपस्थितांना भारावून टाकले. शिवबा माझा राजा आणि धन्य धन्य जिजाऊ माता हे पोवाडे विशेष दाद मिळवून गेले.
शिवबाला जसे घडविले तशी जिजाऊ असावी या गीतातून राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, हिरकणी, झाशीची राणी आणि पद्मावती यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. माता जिजाऊची पुण्याई या सादरीकरणातून मातृत्व आणि संस्कारांची महती अधोरेखित झाली. अंधार फार झाला दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या प्रेरणादायी गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
जेजुरीचा राजा गेला बाणूच्या वाडयाला मल्हारी मार्तंड हे गीत तसेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी यांच्यावरील अग अंबाबाई लाड लाड ये गं आणि गोंधळी गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी या गोंधळ गीतांनी धार्मिक रंगत वाढवली. स्वराज्याच तोरण बांधल या गीतावर तरुणाईने उत्स्फूर्त प्रतिसाद देत जल्लोष केला.
यावर्षी महोत्सव समितीचे अध्यक्ष आकाश मिलिंदराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले. आकर्षक प्रकाशयोजना, दर्जेदार ध्वनीव्यवस्था आणि देखणी रंगमंच सजावट यामुळे कार्यक्रमाची शोभा खुलली. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी समितीच्या वतीने कोकाटे परिवारांकडून नगराध्यक्षा नेहा काकडे यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. दत्ता बंडगर, रोहित पडवळ, संदीप इंगळे, बलराज रणदिवे यांच्यासह समितीचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात ‘जागतिक युनानी दिवस’ उत्साहात

Next Post

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अफरोज सिद्दिकी यांची कार्यालयीन अधीक्षकपदी बढती

Related Posts

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;
सामाजिक

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;

September 10, 2026
ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अफरोज सिद्दिकी यांची कार्यालयीन अधीक्षकपदी बढती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!