• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात ‘जागतिक युनानी दिवस’ उत्साहात

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 13, 2026
in आरोग्य
0
0
SHARES
0
VIEWS

हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात ‘जागतिक युनानी दिवस’ उत्साहात



धाराशिव,दि.12 फेब्रुवारी (प्रतिनिधी) जिल्हा रुग्णालय,धाराशिव येथे दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी जागतिक युनानी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही आयुष विभागाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी आयुष विभागातील युनानी तज्ज्ञ डॉ.अबरार अहेमद देशमुख यांनी प्रास्ताविकात हकीम अजमल खान यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला.हकीम अजमल खान हे स्वातंत्र्यसैनिक,प्रख्यात युनानी चिकित्सक,शिक्षक आणि समाजसुधारक होते.त्यांनी युनानी चिकित्सा प्रणालीला वैज्ञानिक दृष्टिकोनातून विकसित करून तिचे महत्त्व देश-विदेशात पोहोचविले, असे त्यांनी सांगितले.

डॉ.धनंजय चाकूरकर,जिल्हा शल्यचिकित्सक,धाराशिव व डॉ. सतीश हरिदास,जिल्हा आरोग्य अधिकारी,धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.

डॉ.शिवाजी फुलारी यांनी मार्गदर्शनपर भाषणात युनानी औषधपद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट केली.

युनानी वैद्यक ही ग्रीक,अरबी आणि भारतीय संस्कृतींच्या संगमातून विकसित झालेली पारंपरिक आणि प्राचीन उपचारपद्धती आहे. शरीरातील रक्त,कफ,पित्त आणि काळे पित्त या चार द्रव्यांच्या संतुलनावर आरोग्य अवलंबून असते, असा युनानी तत्त्वज्ञानाचा मूलभूत सिद्धांत आहे.या द्रव्यांमध्ये असमतोल निर्माण झाल्यास रोग उद्भवतात,त्यामुळे नैसर्गिक औषधे, वनस्पती,योग्य आहार आणि संतुलित जीवनशैली यांना युनानी उपचारपद्धतीत विशेष महत्त्व दिले जाते,असे त्यांनी सांगितले.

भारतामध्ये युनानी वैद्यकाला आयुष मंत्रालयामार्फत विशेष प्रोत्साहन दिले जात आहे.देशभरात अनेक रुग्णालये व दवाखान्यांमध्ये युनानी उपचार उपलब्ध असून त्वचारोग, सांधेदुखी,पचनविकार तसेच दीर्घकालीन आजारांवर ही पद्धत प्रभावी ठरत असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.

युनानी दिवस साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे या प्राचीन व नैसर्गिक उपचारपद्धतीबाबत जनजागृती करणे हा आहे.आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संतुलित आणि नैसर्गिक जीवनपद्धतीचा अवलंब करणे आवश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमास डॉ.नितीन भोसले (बालरोगतज्ज्ञ),डॉ.अंजली पवार (हॉस्पिटल मॅनेजर),डॉ.अबरार अहेमद देशमुख,डॉ.महेवीश शेख (युनानी तज्ज्ञ),डॉ.पल्लवी कोथळकर (आयुर्वेद तज्ज्ञ),डॉ. उजमा सय्यद,डॉ.सिमा पवार (होमिओपॅथी तज्ज्ञ),श्री.किरण बारकुल (फॅसिलिटी मॅनेजर),श्री. भारत हिंगमिरे (निसर्गोपचार तज्ज्ञ तथा औषधनिर्माण अधिकारी),श्री. मनोज पतंगे (योग तज्ज्ञ), श्रीमती मनीषा अंगरखे,श्री.फारुख काजी, श्री.सरवदे तसेच रुग्ण,नातेवाईक आणि अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही विशिष्ट उपचारपद्धती किंवा आजाराबाबत अधिक माहिती हवी असल्यास जिल्हा रुग्णालय, धाराशिव येथील आयुष विभागाशी संपर्क साधून या सेवांचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तानाजी लाकाळ यांनी केले आहे.

Previous Post

खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Next Post

भाजपा नेते मल्हार राणा जगजितसिंह पाटील यांच्या सौजन्याने मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, धाराशिव आयोजित महाराष्ट्राचा शाहिरी बाणा : फोक आख्यानातून लोकसंगीताचा जल्लोष

Related Posts

मास्क काढा म्हणत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी हुज्जत;
आरोग्य

मास्क काढा म्हणत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी हुज्जत;

September 19, 2026
पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही
आरोग्य

पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही

September 6, 2026
भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…दरवर्षी शिबिर भरविण्याचा मानस – मल्हार पाटील
आरोग्य

भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…दरवर्षी शिबिर भरविण्याचा मानस – मल्हार पाटील

July 22, 2026
भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करा – जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ
आरोग्य

भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करा – जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ

July 22, 2026
तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार! मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही
आरोग्य

तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार! मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही

July 16, 2026
आरोग्य

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी नौमान शेख यांचा अधिष्ठाता चौहान यांच्या हस्ते गौरव

January 26, 2026
Next Post

भाजपा नेते मल्हार राणा जगजितसिंह पाटील यांच्या सौजन्याने मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, धाराशिव आयोजित महाराष्ट्राचा शाहिरी बाणा : फोक आख्यानातून लोकसंगीताचा जल्लोष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!