• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

धाराशिव नगर परिषदेची सत्ता ‘वंचितला’ दिल्यास सर्व मुलभूत सोयीसुविधा देणार – सुजात आंबेडकर

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 27, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव नगर परिषदेची सत्ता ‘वंचितला’ दिल्यास सर्व मुलभूत सोयीसुविधा देणार – आंबेडकर


वंचितचे उमेदवार निवडून देण्याचा नागरिकांचा निर्धार !
प्रचार सभेस तुफान गर्दी

धाराशिव दि.२७ (प्रतिनिधी) – आजपर्यंतच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी धाराशिव शहरातील कचरा डेपो उभा केला नाही. रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे असून रस्त्यावर दिवे देखील लावलेले नाहीत. कचऱ्याचा ढिगारा ठिकठिकाणी साचलेला दिसत असून शहराला सोयीसुविधा देण्याऐवजी भकास करून टाकले आहे. त्यामुळे धाराशिव शहरातील नागरिकांना मूलभूत गरजा उपलब्ध करून देण्यास सत्ताधारी सपशेल अपयशी ठरले असल्याचा घनघाती आरोप केला. हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी धाराशिवरांनो तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या हाती सत्ता दिल्यास सर्व प्रकारच्या मूलभूत सोयीसुविधा निश्चितपणे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ठाम आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात प्रकाश आंबेडकर यांनी दि.२६ नोव्हेंबर रोजी दिले.
वंचित बहुजन आघाडीच्या धाराशिव नगर परिषदेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी बहुजन आघाडीचे जिल्हा निरिक्षक आविनाश भोसीकर, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य डॉ.नितिन ढेपे, महाराष्ट्र फाऊंडेशनचे अध्यक्ष मुफ्ती वसीम वल्लीमा, वंचितचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रविण रणबागुल, जिल्हाध्यक्ष ॲड प्रणित डिकले, जिल्हा संघटक विकास बनसोडे यांच्यासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुरेखा वाघमारे, नामदेव वाघमारे, सोनल बनसोडे, जयदीप दळवे, विजयाबाई नागटिळे, शितल चव्हाण, महादेव एडके, क्षमा सिरसाटे आदी उपस्थित होते. आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की, आमदार व खासदार यांना अनुक्रमे पाच व दहा कोटी रुपये वर्षासाठी विकास कामांसाठी निधी मिळतो. मात्र, नगरसेवकाला कामासाठी वर्षाकाठी १५ कोटी रुपये मिळत असल्यामुळे खासदार व आमदार यांच्यापेक्षा नगरसेवक मोठा असून त्यांची विकास कामांमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. कारण नगरसेवक हा त्या प्रभागातील गल्लीतील व दररोज त्याला माहीत असणाऱ्या समस्यांशी तो निगडित असतो. तो आपल्या खांद्याला खांदा लावून बसतो. त्यामुळे तो त्या समस्या प्राधान्याने सोडविण्यास पुढाकार घेत असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या हक्काच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. शहरवासियांना ८ दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे ही बाब अत्यंत गंभीर असून आम्ही दररोज पाणी पुरवठा करु असे आश्वासन त्यांनी दिले. नगर परिषदेच्या शाळा दर्जेदार करण्यासह इंग्लिश माध्यमाच्या शाळा सुरू करणार, बगीच्या व वयोवृद्धांना बसण्यासाठी पार्क करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष ऍड प्रणित डिकले, डॉ नितीन ढेपे, मुफ्ती व नामदेव वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष ॲड. डिकले यांनी तर सूत्रसंचालन अलंकार बनसोडे यांनी व उपस्थितांचे आभार भैय्यासाहेब नागटिळे यांनी मानले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

धाराशिव नगर परिषद निवडणुकीतील प्रभाग क्र.१ मध्ये अपक्ष उमेदवार आकाश राम सहाणे यांचा भाजपला जाहीर पाठिंबा!

Next Post

प्रभाग 18 मध्ये पॅनल एक… पण नेते दोन दिशेला! ‘तुझं माझं जमेना, तुझ्या बिना करमेना’ अशी राजकीय गत…

Next Post

प्रभाग 18 मध्ये पॅनल एक… पण नेते दोन दिशेला! ‘तुझं माझं जमेना, तुझ्या बिना करमेना’ अशी राजकीय गत...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.