• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

अतिवृष्टीत खरडून गेलेल्या जमिनी व फळबागांना नुकसानभरपाई द्यावी – आ. कैलास पाटलांची मागणी

wp@dktechs.in by wp@dktechs.in
October 18, 2025
in कृषी
0
0
SHARES
0
VIEWS

सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरडुन गेलेल्या जमीनी व फळबांगांना पंचनाम्यानुसार नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची आमदार . कैलास पाटील यांची मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे मागणी.


धाराशिव ता. 18: सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरडुन गेलेल्या जमीनी व फळबांगांना महसुल, कृषी विभागाने केलेल्या पंचनामा,नुकसान प्रकार आणि प्रमाण यानुसार वाढीवची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केल्याची माहिती जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी दिली आहे.
जिल्हयासह राज्यातील 31 जिल्हयामध्ये जुलै ते ऑगस्ट मध्ये मोठया प्रमाणात अतिवृष्टी आणि सततचा पावसाचे पाणी साठल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन, उडीद, मुग, मका, कापुस पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानीचे पंचनामे होऊन महसुल, कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्याच्या आधारे शासनास नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव सादर केल्यानंतर शासनाकडुन मदत जाहीर करण्यात आली. मात्र त्यानंतर सप्टेंबर मध्ये पुन्हा अतिवृष्टी झाली ऑगस्टमध्ये फक्त पिकाचे नुकसान झाले होते परंतु सप्टेंबर मध्ये त्याच पिकाखालची जमीन खरडुन गेली. त्यामुळे ऑगस्ट पेक्षा सप्टेंबर मध्ये शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टी, पुरस्थिती, चक्रीवादळ, या सारख्या नैसर्गीक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्याने पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे यासाठी शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरुपात एका हंगामात एकवेळेस या प्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधुन विहीत दराने मदत देण्यात येते.मात्र धाराशिव जिल्हयासह राज्यातील 31 जिल्हयामध्ये जुलै-ऑगस्ट मध्ये अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे होऊन नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडे अहवाल सादर झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये त्याच पिकाखालील जमीन खरडुन गेल्याने शासन निर्णयाच्या निकषानुसार एका शेतकऱ्याला एका हंगामामध्ये दुसरी मदत मिळण्यास अडचणीचे ठरणार आहे. ऑगष्टमध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यामध्ये पिकाचे सर्वच नुकसान झाल्याने अल्पभुधारक शेतकऱ्याचे सर्वच क्षेत्र नुकसानग्रस्त म्हणुन दाखवले होते.
परंतु सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीने जमीन खरडुन गेल्याने संबंधित शेतकऱ्यांची शेतजमीन व शेतीपिके यांचे एकत्रीत नुकसान दाखवण्यासाठी शेतजमीन शिल्लक नाही. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होणार आहे. त्याचबरोबर जुलै ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करत असताना कोरडवाहु जमीनीवरील पिकांचे पंचनामे झाले आहेत परंतु सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे फळबागांचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांचेही पंचनामे महसुल,कृषी विभागाने केलेले आहेत. त्या पंचनाम्यानुसार सप्टेंबर मध्ये अतिवृष्टीने खरडुन गेलेल्या जमीनी व फळबांगानाही नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे जे नुकसान ऑगस्ट च्या तुलनेत तीव्र आहे.त्यामुळे आमदार कैलास पाटील यांनी मदत व पुन र्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे मागणी केली आहे अशी माहिती जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी दिली आहे.

Previous Post

समाजसेवक अझहर पठाण यांच्या पुढाकाराने प्रभाग १८ शंभर एलईडी लाईट्सने उजळणार!

Next Post

पुरात वाहून गेलेल्या कुटुंबियांना केली आर्थिक मदत…एक हात मदतीचा ग्रुपचा आधार !

Related Posts

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक
कृषी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
कृषी

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

October 2, 2026
दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे
कृषी

दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे

September 26, 2026
जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;
कृषी

जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;

September 26, 2026
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार
कृषी

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार

September 23, 2026
धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!
कृषी

धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!

September 22, 2026
Next Post

पुरात वाहून गेलेल्या कुटुंबियांना केली आर्थिक मदत...एक हात मदतीचा ग्रुपचा आधार !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!