• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – आपत्ती निवारण मंत्री गिरीष महाजन

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 23, 2025
in कृषी
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – आपत्ती निवारण मंत्री गिरीष महाजन


पुरबधित चिंचपूर (ढगे) व वागेगव्हाण शेतशिवाराची केली पाहणी
धाराशिव दि.२३ सप्टेंबर (प्रतिनिधी) जिल्ह्यातील काही भागात २१ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे व त्यामुळे आलेल्या पुरामुळे शेतपिकांचे व मालमत्तेचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर कधीही आली नव्हती.शेतकरी आज अडचणीत सापडला असताना सरकार भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही आपत्ती निवारण व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

आज जिल्ह्यातील भूम तालुक्यातील चिंचपूर (ढगे) गावाजवळील शेतकरी गणेश मोरे यांच्या शेतात अतिवृष्टी व पुराने नुकसान झालेल्या पिक नुकसानीची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी.महाजन बोलत होते.यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक रितू खोखर,भूमचे उपविभागीय अधिकारी.डोंगरे,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप सेंगलवार,जलसंपदाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता.भंडे,प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.आसलकर,तहसीलदार जयंत पाटील यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

महाजन पुढे म्हणाले,मोठ्या प्रमाणात जमिनी खरडून गेल्या आहेत.विहिरी क्षतीग्रस्त झाल्या आहेत,नुकसानीची मदत करण्यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.मुख्यमंत्री फडणवीस यांना देखील जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची जाणीव आहे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नक्की मदत करण्यात येईल.असे त्यांनी सांगितले.

परंडा तालुक्यातील वागेगव्हाण गावाला महाजन यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.तेथून जवळच असलेल्या थोरबोलेवस्ती आणि जगतापवस्ती येथून एनडीआरएफच्या पथकाने सुखरूप सुटका केलेल्या नागरिकांशी देखील त्यांनी संवाद साधला व सध्या या वस्तीत अडकून पडलेल्या नागरिकांशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांना धीर दिला.उदया सकाळी आपल्याला हेलिकॉप्टरच्या मदतीने सुखरूप आणण्यात येईल.असे त्यांना सांगितले.तसेच त्यांनी एनडीआरएफच्या जवानांसोबत सुरू असलेल्या बचावकार्याबाबत चर्चा करून माहिती घेतली.

Tags: dharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadआपत्तीग्रस्त शेतकरीकर्जमाफी अतिवृष्टी अनुदान मदतकार्य आमदार खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

धारासूरमर्दिनी देवीची सीओ अंधारे यांच्या हस्ते महाआरती

Next Post

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर

Next Post

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • पावसाळ्यापूर्वी प्रभाग क्र. ९ मधील नाले-गटारी तातडीने साफ करा इनामदार यांची मागणी
  • इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन ; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला
  • बूथ मजबूत तर पक्ष मजबूत राष्ट्रवादी काँग्रेस श. प.पक्षाची संघटनात्मक बैठक संपन्न
  • महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”“शहरातील हायवा गायब
  • “महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”

Recent Comments

  1. Chief Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Chris Webber on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Allen Bell on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Cody Smith on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Carl James on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.