• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवात स्थानिक कलावंतांना संधी द्या, अन्यथा आंदोलन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा ईशारा

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 21, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवात स्थानिक कलावंतांना संधी द्या, अन्यथा आंदोलन

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा ईशारा


धाराशिव – महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत ‘श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सव’ तुळजापूर येथे आयोजित करण्यात आला आहे . यामध्ये स्थानिक लोककला, लोकनृत्य, अंबाबाईचे गोंधळी गीत, भारुड, जाखडी इत्यादी लोक कलाप्रकारांचा समावेश करण्यात आलेला आहे. परंतु या महोत्सवा मध्ये जिल्ह्यातील स्थानिक कलावंतांना सहभागी किंवा संधी देण्यात आली नाही.स्थानिक कलावंतांना संधी न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन करण्याचा ईशारा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नियामक मंडळाचे सदस्य विशाल शिंगाडे यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी शुक्रवार 19 सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत सन 2025-26 या वित्तीय वर्षात आयोजित करण्यात येणाऱ्या महोत्सवाच्या दिनदर्शिकेमध्ये ‘श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सव’ या महोत्सवाचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये स्थानिक लोककला, लोकनृत्य, अंबाबाईचे गोंधळी गीत, भारुड, जाखडी इत्यादी लोक कलाप्रकारांचा समावेश करण्यात आलेला आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा धाराशिव ही मागील 24 वर्षापासून सांस्कृतिक व लोककला जोपासण्यास अग्रेसर राहिलेली आहे. यामध्ये शाखेकडे जवळपास 70 कलाकार तुळजाभवानी देवीचे आराधना करणारे आराधी, जोगवा, गोंधळी, पोतराज लोकनृत्य व लोकगीत, भारुड, वासुदेव, वाघ्या-मुरळी, जोगत्या जोगतीन इत्यादी कला प्रकार आम्ही सादर करत आलेलो आहोत.

हे लोकनृत्य आत्तापर्यंत क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे व सांस्कृतिक संचालनालय, च्या वतीने महाराष्ट्र आणि देशभर कार्यक्रम केलेले आहेत. युवा महोत्सवामध्ये घेण्यात येणाऱ्या लोकनृत्य कला प्रकारात सात वेळेस राष्ट्रीय पातळीवर सादर केलेले आहेत.

सन 2023 मध्ये नाशिक येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि भारत सरकार च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये आमच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवून लोकनृत्यामध्ये महाराष्ट्राचे नाव देशभरात गाजवले आहे. या अनुषंगाने तुळजापूर येथे होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये स्थानिक कलावंत म्हणून संधी देण्यात यावी.

आमच्या सर्व कलाकारांचा उदरनिर्वाह कलेवरतीच अवलंबून आहे. तसेच लोप पावत चाललेल्या जिल्हयातील कला जोपासण्याचे काम आम्ही करत आलेलो आहोत. आम्हाला जर सलग दहा दिवस कार्यक्रम देण्यात नाही आले तर आपल्या आवारात सलग दहा दिवस तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे.


दिलेल्या निवेदनावर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्यकारणी सदस्य विशाल शिंगाडे, सुगत सोनवणे, शशिकांत माने, सतीश ओहळ, सुरेश देवकुळे, सुहास झेंडे,शुभम खोत, विश्वनाथ काळे, आलम बेग, यशवंत शिंगाडे,सुमित शिंगाडे, जितेंद्र बनसोडे,विजय उंबरे,रोहित शिंगाडे आदींच्या सह्या आहेत.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद 

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  dharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadआई तुळजाभवानीउस्मानाबादजिल्हाधिकारीतुळजापूरतुळजाभवानीदसरा मेळावाधाराशिवनवरात्र उत्सवनवरात्र महोत्सव
Previous Post

मुरूम मंडळात अतिवृष्टीचा तडाका खरिपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकरी बांधव अडचणीत

Next Post

सम्यक गायकवाड याची विभाग स्तरावर कुस्तीसाठी निवड

Related Posts

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
महाराष्ट्र

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
Next Post

सम्यक गायकवाड याची विभाग स्तरावर कुस्तीसाठी निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!