• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

बसच्या ताफ्यात लवकरच ८ हजार ३०० बसेस दाखल होणार – मंत्री सरनाईक

wp@dktechs.in by wp@dktechs.in
October 27, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बसच्या ताफ्यात लवकरच ८ हजार ३०० बसेस दाखल होणार – मंत्री सरनाईक

धाराशिव दि.२७ (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची वाहिनी म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस ओळखली जाते. या महामंडळाच्या माध्यमातून गाव तिथे एसटी या धोरणानुसार बसचा प्रवास सहज व सुलभरित्या आणि योग्य दरात करता येतो. आधुनिकतेच्या वाटेवर एसटी महामंडळाने बसमध्ये देखील काळानुरूप बदल केले आहेत. या महामंडळाच्या ताब्यात लवकरच ८ हजार ३००  बसेस दाखल होणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील प्रवासी नागरिकांना दिवाळीची गोड व आरामदायी प्रवासाची भेट मिळाली आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांसाठी गाव तेथे एसटी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या बसच्या माध्यमातून गाव, वाडी व वस्तीपासून ते थेट राजधानीपर्यंत सर्वसामान्यांना आरामदायी आणि सुरक्षितपणे प्रवास करता येतो. मात्र एस टी महामंडळाच्या पूर्वीच्या बसेस जुन्या झाल्या असल्यामुळे नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचे काम एसटी महामंडळाच्या माध्यमातून केले जात आहे. आगामी चार वर्षात या महामंडळाच्या ताब्यात आधुनिक पद्धतीच्या हजारो बसेस दाखल होणार आहेत. त्याचाच भाग म्हणून लवकरच  एसटीच्या ताफ्यात ८ हजार ३०० नव्या कोऱ्या बसेस येणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. त्या बसेस राज्यातील प्रत्येक आगाराला उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

……

जुन्या सर्व बसेस भंगारात काढून नवीन बसेस देणार

एस.टी. महामंडळाच्या ताफ्यात जुन्या बसेस आहेत. त्या सर्व बसेस भंगारात काढून नवीन बसेस प्रवाशांना उपलब्ध करून देणार आहोत. प्रवाशांना सुखद व आरामदायी प्रवास कसा मिळेल ? यावर विशेष भर देण्यात येणार आहे. आगामी काळात एक देखील जुनी बस रस्त्यावर धावणार नसून सर्व नवीन बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ३ हजार बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच
प्रवाशांना आरामदायक आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांचा प्रवास सुखद व्हावा यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv livedharashiv lokmadat newsउप प्रादेशिक परिवहन अधिकारीधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपरिवहन मंत्री प्रताप सरनाईकमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळमुंबई
Previous Post

प्रभाग क्रमांक २० मध्ये विलास (बापू) लोंढे यांच्याकडून १२७५ दिवाळी किट वाटप – आ. पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

Next Post

ही तुमची लायकी म्हणत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी फेसबुक पोस्ट करीत पुन्हा डिवचले!

Next Post

ही तुमची लायकी म्हणत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी फेसबुक पोस्ट करीत पुन्हा डिवचले!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • ह.भ.प. कल्याणराव चव्हाण यांचे धाराशिव
  • “हायकोर्टाचा कडक दणका! महाकाली कला केंद्रावर सीलची तलवार — नियमभंग उघड, कारवाई अटळ”
  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट

Recent Comments

  1. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.