• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

“हायकोर्टाचा कडक दणका! महाकाली कला केंद्रावर सीलची तलवार — नियमभंग उघड, कारवाई अटळ”

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
April 13, 2026
in Uncategorized
0
“हायकोर्टाचा कडक दणका! महाकाली कला केंद्रावर सीलची तलवार — नियमभंग उघड, कारवाई अटळ”
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“हायकोर्टाचा कडक दणका! महाकाली कला केंद्रावर सीलची तलवार — नियमभंग उघड, कारवाई अटळ”

धाराशिव | लोकमदत न्यूज धाराशिव जिल्ह्यातील वादग्रस्त महाकाली कला केंद्राविरोधात अखेर कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा झाला असून छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवली आहे. याचिकाकर्ते राजाभाऊ सीताराम माळी यांनी स्वतःच याचिका मागे घेतल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला असून आता केंद्र सील करण्याची कारवाई अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.न्यायमूर्ती वैशाली पाटील जाधव व नितीन सूर्यवंशी यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण आदेश दिला. सरकारी बाजू मांडताना सरकारी वकील पी. के. लखोटीया यांनी प्रशासनाचा अहवाल न्यायालयासमोर सादर केला. न्यायालयाने याचिकाकर्त्याकडे अन्य कायदेशीर पर्याय उपलब्ध असल्याचे नमूद करत प्रकरणावर पुढील सुनावणी घेण्यास अनुत्सुकता दर्शवली, त्यानंतर याचिका मागे घेण्यास परवानगी देण्यात आली.गेल्या काही महिन्यांपासून महाकाली कला केंद्र हे नियमांचे सर्रास उल्लंघन, हाणामाऱ्या, गुन्हेगारी हालचाली आणि बेकायदेशीर व्यवहारांमुळे चर्चेत होते. प्रशासनाने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात अनेक गंभीर बाबींचा पर्दाफाश झाला आहे.तपासणीत उघड झाले की, कोणतेही वैध परवाने नसताना केंद्र सुरू ठेवण्यात आले होते. आपत्कालीन बाहेर पडण्यासाठी आवश्यक व्यवस्था नव्हती, रंगमंच व प्रेक्षकांसाठी बसण्याची सुविधा नव्हती. याशिवाय १० वातानुकूलित खोल्यांमध्येच नृत्य सादरीकरण केले जात असल्याचे समोर आले. जीएसटी नोंदणी, तिकीट प्रणाली आणि कलाकारांची अधिकृत माहिती देण्यातही मोठ्या त्रुटी आढळल्या.याहून गंभीर बाब म्हणजे कला केंद्राच्या शेजारीच बिअर बार आणि लॉजिंग व्यवसाय सुरू असल्याचे निरीक्षणात आले. ग्रामसभेची मान्यता आणि आवश्यक कागदपत्रे नसतानाही हे केंद्र चालवले जात असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर या प्रकरणाला गती मिळाली. पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी केंद्र सील करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतिम निर्णयाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.एकूणच, न्यायालयाच्या आदेशानंतर महाकाली कला केंद्रावरील कारवाई अटळ मानली जात असून, “सील कधी?” हा प्रश्न आता सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात

Recent Posts

  • “हायकोर्टाचा कडक दणका! महाकाली कला केंद्रावर सीलची तलवार — नियमभंग उघड, कारवाई अटळ”
  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.