• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

दुचाकींसाठी ‘MH25BL’ मालिका लवकरच सुरू ; आकर्षक क्रमांकांसाठी आगाऊ अर्ज व लिलाव प्रक्रिया जाहीर

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 18, 2026
in महाराष्ट्र
0
दुचाकींसाठी ‘MH25BL’ मालिका लवकरच सुरू ; आकर्षक क्रमांकांसाठी आगाऊ अर्ज व लिलाव प्रक्रिया जाहीर
0
SHARES
23
VIEWS

दुचाकींसाठी ‘MH25BL’ मालिका लवकरच सुरू ; आकर्षक क्रमांकांसाठी आगाऊ अर्ज व लिलाव प्रक्रिया जाहीर

धाराशिव लोकविचार उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव येथे दुचाकी वाहनांसाठी ‘MH25BL’ ही नवीन नोंदणी मालिका लवकरच सुरू करण्यात येणार असून आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची तसेच लिलाव प्रक्रिया राबविण्याची कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे.

नवीन वाहन मालिका सुरू होण्याच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होत असल्याने कार्यालयीन व्यवस्थेवर ताण पडतो. तसेच नागरिकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागतो. नागरिकांचा त्रास कमी व्हावा आणि त्यांना पसंतीचे आकर्षक क्रमांक सुलभतेने उपलब्ध व्हावेत,यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

ज्या वाहनमालकांना आकर्षक अथवा पसंतीचे नोंदणी क्रमांक विहित शुल्क भरून हवे असतील, त्यांनी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत.अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम ४ तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम ५-अ नुसार पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक राहणार आहे. यामध्ये आधारकार्ड,लाईट बिल, टेलिफोन बिल आदी कागदपत्रांचा समावेश राहील.तसेच आकर्षक क्रमांकासाठी निर्धारित शुल्काचा डिमांड ड्राफ्ट (डी.डी.) अर्जासोबत जमा करणे बंधनकारक राहणार आहे.

सदर डी.डी. हा फक्त “Deputy Regional Transport Officer, Dharashiv” या नावाने व केवळ राष्ट्रीयीकृत बँकेचाच असणे आवश्यक आहे.अन्य नावाचे डी.डी. ग्राह्य धरले जाणार नाहीत.तसेच डी.डी.व्यतिरिक्त बँकेने जारी केलेले बँकर्स चेक स्वीकारले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. डी.डी.ची मुदत किमान एक महिना असणे आवश्यक राहील.एखाद्या क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास त्यांची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येईल.

संबंधित अर्जदारांना अतिरिक्त रकमेचा डी.डी.सीलबंद लिफाफ्यात निश्चित तारखेला कार्यालयात जमा करावा लागेल.लिलावासाठी सादर करण्यात येणारा अतिरिक्त रकमेचा डी.डी. किमान ३०० रुपयांपेक्षा कमी नसावा.हा डी.डी.देखील “Deputy Regional Transport Officer, Dharashiv” या नावाने व राष्ट्रीयीकृत बँकेचाच असणे आवश्यक आहे.संबंधित अर्जदारांकडून प्राप्त झालेले अतिरिक्त रकमेचे डी.डी.अर्जदार किंवा त्यांच्या प्रतिनिधींसमक्ष तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, धाराशिव यांच्या उपस्थितीत उघडण्यात येतील.ज्या अर्जदाराने सर्वाधिक रकमेचा डी.डी.सादर केला असेल,त्यास संबंधित आकर्षक क्रमांक वितरित करण्यात येणार आहे.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. राखीव क्रमांक मिळाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत वाहन नोंदणीसाठी सादर करून क्रमांक प्राप्त करणे आवश्यक राहील.अन्यथा संबंधित राखीव क्रमांक आपोआप रद्द होईल आणि भरलेली फी शासन जमा करण्यात येईल.कोणत्याही परिस्थितीत भरलेली फी परत केली जाणार नाही अथवा तिचे समायोजनही केले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आकर्षक तसेच पसंतीच्या क्रमांकासाठी अर्जाचा विहित नमुना तसेच प्रतिनिधीमार्फत अर्ज करावयाचा असल्यास प्राधिकृत पत्राचा नमुना कार्यालयीन वेळेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आला आहे.

‘MH25BL’ मालिकेसाठी वेळापत्रक पुढीलप्रमाणे :दि.१८ मे २०२६ ते २० मे २०२६ दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत आकर्षक व पसंती क्रमांकांसाठी अर्ज आणि डी.डी. स्वीकारले जातील.दि. २० मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता एकाच क्रमांकासाठी दोन किंवा अधिक अर्ज प्राप्त झालेल्या अर्जदारांची यादी कार्यालयीन नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येईल.दि.२१ मे २०२६ रोजी सकाळी १२ वाजता संबंधित अर्जदार किंवा प्रतिनिधींकडून सीलबंद लिफाफ्यात अतिरिक्त डी.डी.स्वीकारून त्यांच्यासमक्ष लिलाव प्रक्रिया पार पाडण्यात येईल.अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी दिली.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपरिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक
Previous Post

लातूर–बीड–धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी डॉ. प्रतापसिंह पाटील यांनाच उमेदवारी द्या; राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) कार्यकर्त्यांची जोरदार मागणी

Next Post

अधिक मासानिमित्त धार्मिक स्थळांसाठी एसटीच्या जादा बसेस; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा, ४० प्रवाशांचा गट झाल्यास विशेष बस उपलब्ध ॥

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post
अधिक मासानिमित्त धार्मिक स्थळांसाठी एसटीच्या जादा बसेस; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा, ४० प्रवाशांचा गट झाल्यास विशेष बस उपलब्ध ॥

अधिक मासानिमित्त धार्मिक स्थळांसाठी एसटीच्या जादा बसेस; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा, ४० प्रवाशांचा गट झाल्यास विशेष बस उपलब्ध ॥

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!