• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास भव्य-दिव्य व दर्जेदारच ५८२ कोटींच्या आराखड्याचा मंत्रालयात आढावा – पालकमंत्री प्रताप सरनाईक

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 4, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास भव्य-दिव्य व दर्जेदारच ५८२ कोटींच्या आराखड्याचा मंत्रालयात आढावा – पालकमंत्री प्रताप सरनाईक

हुडको परिसरात भाविक सुविधा केंद्र, आधुनिक भक्तनिवास, वाहनतळासह विविध प्रकल्प; गुणवत्तेत तडजोड न करण्याचे स्पष्ट निर्देश

मुंबई / लोकमदत न्यूज

मराठवाड्याच्या श्रद्धास्थानाचा मुकुटमणी असलेल्या श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिरच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे ५८२.१७ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी आराखड्याचा आढावा मंत्रालयात घेण्यात आला. परिवहनमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

कोट्यवधी भाविकांच्या अखंड श्रद्धेचे केंद्र असलेल्या या तीर्थक्षेत्राचा विकास पुढील शंभर वर्षांचा विचार करून दूरदृष्टीने व उत्कृष्ट दर्जाने व्हावा, अशा स्पष्ट सूचना सरनाईक यांनी यावेळी दिल्या. मंदिर परिसराचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांचा प्रकल्प नसून तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक अस्मितेशी निगडित असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

भाविकांच्या सोयी-सुविधा वाढविण्यासाठी हुडको पार्किंग परिसरात उभारण्यात येणाऱ्या भाविक सुविधा केंद्र, आधुनिक भक्तनिवास, व्यावसायिक संकुल, बहुउद्देशीय सभागृह आणि विस्तीर्ण वाहनतळ आदी प्रकल्पांचा या आराखड्यात समावेश आहे. यासोबतच भूसंपादन व निविदा प्रक्रियेची सद्यस्थितीही बैठकीत सादर करण्यात आली. गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले.

अयोध्येतील श्रीराम मंदिरच्या निर्मितीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुळजाभवानी मंदिर परिसराचा विकास भव्य, आकर्षक आणि शाश्वत पद्धतीने करण्याचेही निर्देश सरनाईक यांनी दिले. देशातील नामांकित विकासक व तज्ज्ञ संस्थांचा सहभाग घेऊन या प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

याच बैठकीत धाराशिव जिल्ह्यात सुरू असलेल्या इतर महत्त्वाच्या प्रकल्पांचाही सखोल आढावा घेण्यात आला. धाराशिव येथे उभारण्यात येणाऱ्या ५०० खाटांच्या आधुनिक जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाची प्रगती, धाराशिव व परंडा येथील न्यायालयीन इमारती, तुळजापूर येथील व्हीव्हीआयपी विश्रामगृह तसेच विविध रस्ते विकास प्रकल्पांची स्थिती यावर चर्चा झाली. सर्व प्रकल्प नियोजित वेळेत व उच्च दर्जाने पूर्ण करावेत, असे निर्देश देण्यात आले.बैठकीस धाराशिव जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीस धाराशिव जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

धाराशिव तालुक्यात शनिवारपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’

Next Post

लोकमदत न्यूजचा दणका! सांजा रोडवरील दुर्दशेची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन-ठेकेदार हलले धुळीवर पाणी टाकण्याची तात्पुरती मलमपट्टी सुरू!

Related Posts

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा
महाराष्ट्र

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
Next Post

लोकमदत न्यूजचा दणका! सांजा रोडवरील दुर्दशेची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन-ठेकेदार हलले धुळीवर पाणी टाकण्याची तात्पुरती मलमपट्टी सुरू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!