• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 2, 2026
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या संकल्पनेला बळ मातंग समाज स्मशानभूमी स्वच्छतेसाठी नगरपरिषद व समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

धाराशिव | लोकमदत न्यूज

धाराशिव शहरात क्रांतीवीर फकिरा राघोजी साठे यांच्या जयंतीनिमित्त दि. १ मार्च २०२६ रोजी मातंग समाज स्मशानभूमी येथे भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मातंग समाज व धाराशिव नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम पार पडली.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून शहर स्वच्छतेचा व्यापक उपक्रम हाती घेण्यात आला असून, त्या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरवत धाराशिव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. त्याच अनुषंगाने मातंग समाज स्मशानभूमी परिसराची स्वच्छता करण्यात आली.
या उपक्रमासाठी दत्ता (तात्या) पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजबांधवांनी मोठ्या उत्साहात श्रमदान केले. स्मशानभूमी परिसरातील गवत, कचरा व साचलेली घाण काढून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. नगरपरिषदेच्या वतीने दोन ट्रॅक्टर, एक जेसीबी मशीन तसेच महिला व पुरुष सफाई कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली.
उप मुख्याधिकारी तथा स्वच्छता निरीक्षक अभिजीत गोरे यांनी आवश्यक कर्मचारी व यंत्रसामग्री उपलब्ध करून देत मोहिमेला गती दिली. या अभियानाच्या यशस्वितेसाठी सुमेध क्षीरसागर, संतोष पेठे, संतोष शेरा पेठे, सचिन पेठे, अंकुश पेठे, नेताजी क्षीरसागर, पप्पू पेठे, सचिन वाघमारे, जय पेठे, वैभव पेठे, अलोक पेठे, ज्ञानेश्वर पेठे, ऐडके काका पेठे, कालिदास चव्हाण आदींनी विशेष परिश्रम घेतले.
नगराध्यक्ष नेहा काकडे यांनी स्वच्छतेला प्राधान्य देत शहर सुशोभिकरणासाठी विशेष मोहीम साबविण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध प्रभागामध्ये स्वच्छतेचे उपक्रम राबवले जात असून नागरिकांमध्येही सकारात्मक संदेश पहावयास मिळत आहे.
दत्ता पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे स्मशानभूमी परिसर स्वच्छ व सुस्थितीत झाला असून, नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
शहर स्वच्छतेच्या या संकल्पनेतून प्रशासन व समाज यांचा समन्वय दिसून आला असून, आगामी काळातही अशा उपक्रमांना अधिक बळ मिळून असे सामाजिक उपक्रम राबविण्यात यावेत अशी विनंती समाजबांधवरून करण्यात येत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

Next Post

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

Related Posts

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!