• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

पाच टक्के नजराणा रद्द, निवासी मालमत्ता निःशुल्क वर्ग-१ होणार…जिल्ह्यातील दोन हजार मालमत्ताधारकांना मोठा दिलासा – आमदार राणाजगजितसिंह पाटील

wp@dktechs.in by wp@dktechs.in
December 12, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पाच टक्के नजराणा रद्द, निवासी मालमत्ता निःशुल्क वर्ग-१ होणार

जिल्ह्यातील दोन हजार मालमत्ताधारकांना मोठा दिलासा

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती


हैदराबाद अधिनियम क्रमांक आठमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. पाच टक्के नजराणा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील आठही आणि विदर्भातील चंद्रपूर या जिल्ह्यातील रहिवासी क्षेत्रात असलेल्या भोगवटदार वर्ग-२ मालमत्ता वर्ग-१  होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या सुधारणेमुळे रहिवाशी क्षेत्रातील तब्बल ७० हजार प्लॉट अथवा घरे निःशुल्क वर्ग-१  होणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील दोन हजार १६२ मालमत्ताधारकांना त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे निवासी प्रयोजनासाठी असलेल्या या मालमत्तांचे हस्तांतरण करण्यासाठी आता कोणाच्याही अनुमतीची गरज भासणार नसल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

मराठवाडा आणि विशेषत: धाराशिव जिल्ह्यातील वर्ग-२ निवासी जमिनीचा जटील बनलेला प्रश्न आता निकाली निघाला आहे. निवासी प्रयोजनासाठी असलेल्या सर्व मदतमाश वर्ग-२ जमीनी कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता वर्ग-१ होणार असल्याचे राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात जाहीर केले आहे. त्यासाठी हैदराबाद अधिनियम क्रमांक आठमध्ये सुधारणा केली जात असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले आहे. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह झालेल्या बैठकीत यास तत्वतः मान्यता देण्यात आली होती. मराठवाड्यातील एका महत्वपूर्ण विषयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय दिला आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी हा विषय अत्यंत महत्वाचा होता. मराठवाड्यातील ज्या इनामी आणि देवस्थान जमिनी आहेत, त्या तातडीने नियमानुकुल करून घेण्यात याव्यात यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा सुरू होता. नाममात्र नजराणा भरून या जमिनी वर्ग-१ मध्ये परावर्तित करण्याची मागणी आपण सातत्याने लाऊन धरली होती. याबाबत बऱ्याचदा बैठकाही झाल्या. त्यानुसार आता एक महत्वाचा निर्णय आपल्या महायुती सरकारने घेतला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील राजोरा येथील निवासी प्रयोजनासाठी असलेल्या सर्व प्लॉट अथवा घरे निःशुल्क वर्ग-१ केली जाणार आहेत. या महत्वपूर्ण निर्णयामुळे धाराशिवसह मराठवाड्यातील सामान्य नागरिकांचा सुमारे ६९ वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला प्रश्न आता निकाली निघाला आहे. धाराशिव जिल्हा आणि खास करून धाराशिव शहरासाठी हा निर्णय खूप महत्वाचा ठरणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

सन १९५५ सालच्या हैदराबाद अधिनियम क्रमांक आठमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे रहिवाशी क्षेत्रातील मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. निवासी प्रयोजनासाठी असलेल्या घर अथवा प्लॉट अशा मालमत्ता मदतमाश जमिनी दाखवण्यात आल्या होत्या. त्या सर्व नियमानुकूल वर्ग एक केल्या जाणार आहेत. त्यासाठी बक्षीसपत्र, खरेदीखत अथवा भाडेपट्टा आदी कागदपत्रे उपलब्ध असल्यास पुढील प्रक्रिया शक्य होणार आहे. ग्रामपंचायत कार्यालयाकडे आठ अ किंवा नगरपालिकेतही नोंद असल्यास या नोंदीच्या आधारे वर्ग१ ची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यासाठी एकही पैसा शुल्क आकारले जाणार नाही. प्लॉट आणि घर या दोन्ही मालमत्ता या सुधारणेमुळे वर्ग१ भोगवटदार होणार आहेत. त्यामुळे यापुढील काळात बांधकाम परवाना न मिळणे, बँकेकडून कर्ज न मिळणे अशा अनेक अडचणी कायमच्या  दूर होणार आहेत. तसेच या सर्व मालमत्तांचे हस्तांतरण करताना कोणाचीही परवानगी घेण्याची गरज भासणार नसल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

Previous Post

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा : आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

Next Post

नागझरवाडीत माती-पाणी तपासणी मार्गदर्शन कार्यशाळा, शेतकऱ्यांसाठी ‘मृदा आरोग्य तपासणी’चे हक्काचे केंद्र उपलब्ध

Next Post

नागझरवाडीत माती-पाणी तपासणी मार्गदर्शन कार्यशाळा, शेतकऱ्यांसाठी ‘मृदा आरोग्य तपासणी’चे हक्काचे केंद्र उपलब्ध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.