• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

भ्रष्टाचाराविरुद्ध लढ्याला नवी धार : धाराशिवमध्ये दोन संघटनांच्या कार्यालयांचे उद्घाटन उत्साहात

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 6, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

भ्रष्टाचाराविरुद्ध लढ्याला नवी धार : धाराशिवमध्ये दोन संघटनांच्या कार्यालयांचे उद्घाटन उत्साहात

धाराशिव – लोकमदत न्यूज 

समाजातील वाढत्या भ्रष्टाचाराविरुद्ध प्रभावी लढा उभारण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, जिल्हा धाराशिव तसेच पोलीस जाणीव सेवा संघ या दोन सामाजिक संघटनांच्या कार्यालयांचे उद्घाटन आज धाराशिव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील भ्रष्टाचारविरोधी चळवळीला नवी दिशा व बळ मिळणार असल्याची भावना उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
या कार्यालयांचे उद्घाटन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सम्मेद तरटे तसेच जिल्हाध्यक्ष गणेश प्रभाकर पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळी विविध सामाजिक प्रश्नांवर तसेच भ्रष्टाचाराविरोधातील लढ्याला अधिक संघटित व प्रभावी बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर संघटनांच्या उद्दिष्टांबाबत आणि भविष्यातील कार्ययोजनांबाबत माहिती देण्यात आली. समाजात पारदर्शकता वाढवणे, नागरिकांमध्ये कायद्याबद्दल जागरूकता निर्माण करणे तसेच अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सक्रियपणे काम केले जाईल, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात
भ्रष्टाचाराविरोधातील लढा हा केवळ संघटनांचा नसून संपूर्ण समाजाचा असल्याचे सांगितले. नागरिकांनी जागरूक राहून प्रशासनातील चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे. समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन पारदर्शक आणि जबाबदार व्यवस्था निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला तरच भ्रष्टाचाराला आळा बसू शकतो, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये दत्ता सोनवणे, सावंत साहेब, जळकुटे साहेब, सुषमा शिंदे, सारिका चुंगे, बाळासाहेब पाटील, सलगर ताई, सुरोशी मॅडम, बालाजी जाधव, काका जाधव आदी मान्यवरांचा समावेश होता. सर्वांनी संघटनेच्या कार्याला पाठिंबा देत पुढील काळात समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमादरम्यान भ्रष्टाचारविरोधी जनजागृती, नागरिकांना कायदेशीर मार्गदर्शन, तसेच प्रशासनाशी समन्वय साधून सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. या दोन्ही संघटनांच्या कार्यालयांच्या उद्घाटनामुळे जिल्ह्यातील सामाजिक चळवळींना अधिक बळ मिळणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांनी भ्रष्टाचाराविरोधात एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. समाजातील न्याय, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा यांना प्राधान्य देत आगामी काळात संघटना अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Previous Post

धाराशिव येथे ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे दर्जेदार कामे रुग्णसेवेसाठी वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

Next Post

भूम परंडा वाशी या तिन्ही तालुक्याच्या पंचायत समितीवर तानाजी सावंत यांचे वर्चस्व कायम

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

भूम परंडा वाशी या तिन्ही तालुक्याच्या पंचायत समितीवर तानाजी सावंत यांचे वर्चस्व कायम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!